Home मुंबई प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट  – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट  – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

15
0

आशाताई बच्छाव

1001035005.jpg

 

प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट

– राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राजभवन येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम

 

मुंबई, दि. 10 (विजय पवार युवा मराठा न्यूज नेटवर्क): लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपण या तत्वाचे पालन करित असल्यानेच आपली लोकशाही बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांबाबतचे शिक्षण समाविष्ट करून युवकांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे राज्य मानवी हक्क आयोगामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, आयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेड, आयोगाचे सदस्य एम. ए. सईद, संजय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, जमाती, महिला, मुले, तृतीयपंथी आणि दिव्यांग व्यक्तींचे हक्क हे आपल्या मानवाधिकार अजेंड्याच्या अग्रस्थानी राहिले पाहिजेत. प्रत्येक गट समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि त्यांना समानतेचे आणि आदराचे वातावरण मिळणे आवश्यक आहे.

हवामान बदल व अन्य नैसर्गिक घटक हेदेखील शेतकऱ्यांसमोरील आव्हानांचे व्यापक स्वरूप असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन सेवा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. मानवी हक्क आयोगाचे कार्य दुर्बल घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्यात उपयुक्त ठरले असल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here