आशाताई बच्छाव
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये नंदलाल पाटील कापगते विद्यालयाचे सुयश
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील कु.अक्षरा कोमेद कापगते हिने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये यश संपादन करून जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
शिक्षण विभाग पंचायत समिती साकोली आणि अकॅडमीक हाईट पब्लिक स्कूल साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन दिवसीय दिनांक 7 डिसेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनीचा मुख्य विषय “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” हा असून यामध्ये तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून यामध्ये प्राथमिक गट व माध्यमिक गट तयार करून विज्ञान प्रतिकृती चे परीक्षण करण्यात आले.
यामध्ये नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील कु.आकांक्षा कोमेद कापगते प्राथमिक गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरावर भरारी घेतली आहे तसेच माध्यमिक गटातून प्रथमेश हेमंत कुंभरे विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभाग घेतल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याकरिता विज्ञान शिक्षक के.एम. कापगते, आर.सी.बडोले, डी.आर.देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापिका आर.बी.कापगते यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदनस्पद कौतुक करून शुभेच्छा दिल्या.