आशाताई बच्छाव
वाटे हळूहळू चाला मुखाने राम राम बोल
सिद्ध साक्षी आनंद धाम किटाळीचा चित्तवेधक उपक्रम
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)सिद्ध साक्षी आनंद धाम किटाळीचे संस्थापक साक्षी डमदेव कहालकर महाराज यांनी त्यांचे गुरुदेव साक्षी रामकृपालजी महाराज यांच्या अभिमंत्रित पादुका आश्रमात स्थापन केल्या.त्याप्रित्यर्थ आणि जागतिक अपंग दिनानिमित्त ३डिसेंबर २०२४ ला आश्रमात संंतमेळा भरविला.
सर्वप्रथम हायवे वरचा यादव धाबा येथून ताल, ढोलक, बासरीच्या साथीने, हरिभजनाच्या संगे दोन किमी पर्यंत पायी दिंडी निघाली. दिंडीत साक्षी डमदेव महाराज, सिताराम महाराज दिल्ली, सुखदेवजी उरकुडे महाराज मांडळ ,जीवन विद्या मिशनचे ट्रस्टी संतोष सावंत, साध्वी कोरे ताई, शिवणकर महाराज, बासरीवादक पालिकचंद बिसने, मते महाराज प्रवचनकार, मा. नरेश टिचकुले सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, साध्वी मिरा कहालकर आदी भाविक मंडळी होती.दिंडीने अवघी वनराई दुमदुमली .
किटाळी गावातून दिंडी आश्रमात नाचत नाचत आली. नंतर कार्यक्रमाची सुरुवात सुखदेव उरकुडे महाराज यांच्या कीर्तनाने झाली. क्रमशः साध्वी कोरे ताई,मते महाराज, सिताराम महाराज यांनी कीर्तन केले. नंतर सद्गुरु वामनराव पै जीवन विद्या मिशनचे ट्रस्टी संतोष सावंत यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. हेमा दीदीने ‘माईंड पॉवर ‘ विषयी मार्गदर्शन केले.
मध्यंतरानंतर प्रेरणादायी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला . त्यात कीर्तनकार शिवणकर महाराज व त्यांची भाची साध्वी कोरेताई अंगणवाडी पर्यवेक्षिका मते मॅडम, गिरोला येथील सिंगनजुडे मॅडम, अंगणवाडी शिक्षिका यांचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कर्मयोगी डॉ. हेमकृष्णजी कापगते माजी आमदार यांनी आरोग्य शिबीर आयोजन करून मोफत तपासणी केली व सत्य साईबाबा प्रेमरथ जिल्हा भंडारा द्वारे संपूर्ण मोफत औषधोपचार करण्यात आला. सत्य साईबाबा प्रेमरथाने खूप परिश्रम घेऊन सेवा केली. रात्रीपर्यंत अखंड नाम कीर्तन चालले. यात भजन मंडळ पिंपळगाव (सडक) ,भजन मंडळ गिरोला, भजन मंडळ लाखोरी, भजन मंडळ रेंगेपार, भजन मंडळ दिघोरी मोठी, भजन मंडळ गिरोला, खराशी, लाखोरी यांनी हिरिरीने सहभाग घेतला. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.