Home बुलढाणा ब्रेकिंग! मोताळ्याचे हात तेलंगणापर्यंत ! – बँकेत 14 कोटींचा – दरोडा !

ब्रेकिंग! मोताळ्याचे हात तेलंगणापर्यंत ! – बँकेत 14 कोटींचा – दरोडा !

38
0

आशाताई बच्छाव

1001027609.jpg

ब्रेकिंग! मोताळ्याचे हात तेलंगणापर्यंत ! – बँकेत 14 कोटींचा – दरोडा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्याचे नाव दरोडा प्रकरणात सुद्धा (कू) उंची गाठत आहे. मोताळ्यातील 7 आरोपींपैकी मोताळ्यातील दोन जण तब्बल 14 कोटींच्या दरोडा प्रकरणात तेलंगणा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत ! आरोपी हिमांशू भिकमचंद झंवर राहणार मोताळा जिल्हा बुलढाणा व येथीलच पुन्हई येथे राहणारा सागर भास्कर गोरे हा आरोपी फरार झाला आहे.
तेलंगणा राज्यांमध्ये दोन आठवड्यांपूर्वी एसबीआय बँकेवर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणाचे मोताळा

कनेक्शन उघडकीस आले असून 14 कोटी रुपयांचा दरोडा टाकलेल्या या सात जणांच्या टोळीमधील 2 जण बुलडाणा जिल्ह्यातील मोताळ्याचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तेलंगणा पोलिसांनी या टोळी मधील 3 जणांना पकडण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील एक आरोपी मोताळा येथील हिमांशू भिकमचंद झंवर (वय 30 वर्षे) तर फरार आरोपींपैकी एक सागर भास्कर गोरे (वय 32) हा पुन्हई येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या महिन्यात 18 नोव्हेंबर रोजी रायपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. 7 जणांच्या या टोळीने जवळच्या शेतातून बँकेच्या आवारात प्रवेश केला
खिडकी तोडली आणि बँकेत प्रवेश केला. गॅस कटरच्या साह्याने स्ट्रांग रूम मध्ये प्रवेश करीत तीन लॉकर कापले या टोळीने 13.61 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने गॅस सिलेंडर आणि इतर साधने लंपास केली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी सुद्धा छेडछाड केली होती. चोरीची रक्कम सात समान समभागांमध्ये विभागणी केल्यानंतर ही टोळी 19 नोव्हेंबर रोजी हैदराबाद मधील भाड्याचे घर सोडून त्यांच्या मूळ राज्यात पसार झाली. वारंगल चे पोलीस आयुक्त अंबर किशोर झा यांनी आरोपींच्या शोधासाठी 10 विशेष पथके तयार केली. मॉडर्न टेक्नॉलॉजी च्या साह्याने या पथकांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील 3 सदस्यांना पकडण्यात
यश मिळविले. अटक केलेल्या आरोपींमध्ये उत्तर प्रदेश मधील शहवाजपूर येथील अर्षद अन्सारी (34) आणि शाकीर खान उर्फ बोलेखान ही दोघे तसेच तिसऱ्या आरोपीचे नाव हिमांशू भिकमचंद झंवर, रा. मोताळा, जि. बुलढाणा असे आहे. उत्तर प्रदेश मधील ककराला गावातील सूत्रधार मोहम्मद नवाब हसन यासह उर्वरित 4 संशयितांचे पोलीस शोध घेत आहे. अक्षय गजानन अंभोरे आणि सागर भास्कर गोरे तसेच साजिद खान अशी फरार आरोपींची नावे आहेत. यातील सागर गोरे हा मोताळा तालुक्यातील पुन्हई गावचा रहिवासी असल्याचे कळते. अटक आरोपींकडून पोलिसांनी 2.52 किलो सोन्याचे दागिने 10 हजार रुपये रोख आणि कारसह 1.80 कोटी रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त केली.

Previous articleपान मसाला व सुगंधित जाफरानी जर्दाचे कंटेनर शहर पोलीसांनी पकडले
Next articleमृत बिबट्याचा शोध लावण्यास वनविभागाला अपयश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here