Home विदर्भ तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सचिवांना राज्य दलित मित्र संघाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आदेश...

तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सचिवांना राज्य दलित मित्र संघाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आदेश काढावे

33
0

आशाताई बच्छाव

1001014210.jpg

तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सचिवांना राज्य दलित मित्र संघाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आदेश काढावे
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यांनी राज्याच्या सचिवांना आदेश काढून राज्य दलितमित्र संघाच्या गेल्या अनेक दिवसांपासून मागण्याचां प्रस्ताव प्रलंबित झाल्याने नाराजी सूर निघत आहे. ✍️हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ,(३०)(राज्यस्तरीय वृत्त विशेष.) महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलीत मित्र संघाच्या निवेदनातील न्याय मागण्या मंजूर कराव्यात अशी विनंती हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे ह्यांनी तत्कालीन
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे कडे अधिवेशन दरम्यान २८ जून २०२४ रोजी प्रत्यक्ष भेटून केली होती.ह्या अनुशंगाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ह्यांनी राज्याच्या सामाजिक न्याय सचिवांना सदरील मागण्या तपासून प्रस्ताव सादर करण्याचे तात्काळ आदेशित केले अशी माहिती आमदार मुटकुळे ह्यांनी महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे राज्य कार्याध्यक्ष डॉ.विजय निलावार ह्यांना दिली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी,सचिवांना दिलेल्या आदेशाचे कितपत पालन झाले हे चार महिने उलटले तरी गुलदस्त्यात असल्याने राज्यातील दलितमित्र,समाजभूषण पुरस्कारार्थी मधे प्रचंड नाराजी पसरली आहे. संघाच्या निवेदनात नमूद बाबीत स्वातंत्र्यसैनिकां प्रमाणे पुरस्कारार्थीना प्रतिमाह मानधन व सर्व सुविधा देण्यात याव्यात,सर्व शासकीय, राष्ट्रीय,लोककल्याणकारी उपक्रमास निमंत्रित करण्यात यावे, एस.टी.च्या ताफ्यातील साधी,आराम, निमआराम, बस मधून एका साथीदारासह किलोमिटर मर्यादा न लादता सुरू असलेली मोफत पूर्वापार सवलत आता एस.टी.च्या सर्व प्रकारच्या बसेस मधून परिपत्रक सुधारून राज्यातील एसटी राज्या बाहेर जिथवर जाते तिथवर दोन आरक्षणा सह देय करावी, पुरस्कारार्थिना एस.टी. ने दिलेल्या पासेस नूतनीकरण विभागीय पातळीवर प्रत्यक्षात जावून करवून घेण्या ऐवजी आगार पातळीवर प्रतिवर्षी करून द्यावे, राज्यातील शासकीय,निमशासकीय धर्मादाय व सुपर स्पेशियालिटी तसेच खासगी नामांकित रुग्णालयातून दलीतमित्र व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य आणि केंद्र शासनाच्या असलेल्या सर्व आरोग्य सुविधा मोफत देण्यासाठी स्वतंत्र ओळखपत्र द्यावे, पुरस्कारार्थिना स्वातंत्र्यसेनानी प्रमाणेच एका साथीदारासह रेल्वे प्रवास सवलत मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून शासनाने सुविधा देय करून द्यावी,राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व राष्ट्रीय व लोककल्याणकारी, सेवा कार्याची उद्दिष्ट्य पूर्ती करण्यासाठी दलितमित्राना तालुका ते राज्य पातळीवर विविध विभागांच्या अशासकीय सदस्यपदि नियुक्ती करावी व राष्ट्रीय, शासकीय,लोककल्याणकारी कार्यक्रमात निमंत्रित करण्यात यावे. पुरस्कारार्थिना देय असलेल्या सा.बा.विभागाच्या विश्राम गृहाची सुविधा देण्या बाबत परिपत्रक असताना देखील विभागा कडून अक्षम्य टाळाटाळ करून विश्रामगृह उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते त्याबाबत सा.बा.विभागास प्राधान्याने देय सुविधा देण्यासाठी आदेशित करावे व सुविधा का नाकारण्यात आली त्याचा खुलासा देण्यास संबंधी विभागास आदेश देण्यात यावेत,दरवर्षी शासना कडून निवड झालेल्यांना पुरस्कार वितरण करावे व महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र /समाजभूषण संघाच्या राज्य स्तरीय अधिवेशन साठी किमान १५ लाख रू.अनुदान देवून मुख्यमंत्री आणि संबंधितांनी विकास कामी समन्वय राखावा,आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.ह्या बाबत हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे ह्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांची भेट घेवून सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना चार महिन्यापूर्वीच आदेशित करण्यात यश मिळविले. मागील २० वर्षाच्या कालखंडातील अनेक मुख्यमंत्री,उपमुख्य मंत्री,सामाजिक न्याय मंत्री आदींनी केलेल्या घोषणा, संघा सोबतच्या मंत्रालयातील संबंधित मंत्री महोदय व उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं समवेत च्या संघाच्या बैठका ह्या केवळ शोभेच्या ठरल्या,मात्र तिसऱ्यांदा निवडून आलेले हिंगोली विधान सभेचे कार्य तत्पर आमदार भाजपा नेते तानाजीराव मुटकुळे आणि महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलीत मित्र/समाजभूषण संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व विद्यमान सल्लागार नवनिर्वाचित आमदार अशोकराव माने ह्यांच्या माध्यमातून संघाच्या मागण्यांची फलश्रुती होईल अशी अपेक्षा आहे.ह्या दोन्ही आमदारांना नूतन मंत्री मंडळात मंत्री म्हणून घेण्यात यावे अशी मागणी आहे. आजघडीला मात्र दलितमित्र समाजभूषण पुरस्कार्थींच्या न्याय मागण्या कडे दुर्लक्ष केल्याने राज्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आणि संबंधित मंत्र्यांच्या आदेशाचे पालन कधी होणार व कधी न्याय मिळणार अस संघाचे राज्यअध्यक्ष योगेश वागदे,राज्य कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार,सरचिटणीस भूषण दडवे,कोषाध्यक्ष वृषाली वाघचौरे,राज्य संघटक हरिश्चंद्र माने गुरुजी,व संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी म्हंटले आहे.मागील २० वर्षा पासून अनेक शासनकर्त्या मंडळींनी आदेश देवून जाहीर घोषणा करून ही फलश्रुती झाली नाही त्यामुळे पुरस्स्कारार्थिना कधी न्याय मिळेल ह्याची प्रतीक्षा महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र समाजभूषण संघ करीत आहे. तत्कालीन अनेक मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्र्यांनी राज्यातील अनेक जाहीर कार्यक्रमातून मागण्या मंजूर केल्याच्या घोषणा चे पुरावे संघा कडे असून घोषणाच हवेत विरल्याने विद्यमान शासनाने तरी तत्कालीन शासनकर्त्यानी केलेल्या पोकळ घोषणा आणि दिशाभुल केलेल्या वक्तत्वांची ची पुनरावृत्ती करू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .(राज्यस्तरीय वार्तामूल्य असलेली महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र समाजभूषण संघाची सदरील बातमी) कृपया प्रसारणास्तव दलीत मित्र डॉ.विजय निलावार,ज्येष्ठ पत्रकार हिंगोली तथा राज्यकार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र समाजभूषण .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here