आशाताई बच्छाव
पैसे देण्यास नकार दिल्याने एकास कुऱ्हाडीने मारहाण
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा । पैसे देण्यास नकार दिल्याने एकास कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नळकुंड येथे घडली. याप्रकरणी फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील नळकुंड येथील विलास उखा जाधव यांनी धामणगाव बढे पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास गावातीलच राजु विश्वनाथ सोनोने यांनी दोन हजार रुपये मागितले. या वेळी फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता राजु सोनोने याने फिर्यादीस कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच सतीश माणिकराव बामंदे, विकास राजमल बावस्कर यांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून उपरोक्त तीन जणांविरुद्ध धामणगाव बढे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. गजानन पाटील हे करत आहे.