आशाताई बच्छाव
वाशिम येथे शुक्रवारी अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा वर्धापन दिन कार्यक्रम
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन : वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- देशभरातील ग्रामीण डॉक्टरांना एकीच्या झेंड्याखाली आणण्यासोबतच त्याच्या न्यायहक्कासाठी व्यवस्थेशी सतत संघर्ष करुन ग्रामीण क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्राला संरक्षण, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करुन देणार्या अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचा वर्धापन दिन कार्यक्रम शुक्रवार, २९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता स्थानिक पाटणी कर्मशियल मधील चिंतामणी मिटींग हॉलमध्ये ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कारासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध ह्दयरोग तज्ञ डॉ. सिद्धार्थ देवळे तर अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे हे राहतील. विशेष पाहुणे म्हणून रिपाई आठवलेचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, सुप्रसिद्ध सर्जन डॉ.सौ. तृप्ती गवळी, समाजसेविका डॉ. माया वाठोरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिने अभिनेते डॉ. जितेंद्र गवळी यांची उपस्थिती राहील. प्रमुख उपस्थितीमध्ये सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ डॉ. मंगेश राठोड, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील सिरसाट, विधिज्ञ अॅड. जी.के. गायकवाड, अॅड. मोहन गवई, मनोविकारतज्ञ डॉ. रविंद्र अवचार, पँथर संघटनेचे डॉ. एस. चंद्रशेखर, भिमसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. हिरामण मोरे, युवा कार्यकर्ते यश कंकाळ, दंतरोगतज्ञ डॉ. प्रबोध वानखेडे, अमोल अवताडे यांच्यासह सत्कारमूर्ती म्हणून भूमिपूत्र संघटनेचे अध्यक्ष तथा रिसोड बाजार समितीचे सभापती विष्णूपंत भुतेकर, सुप्रसिद्ध रेडीयोलॉजीस्ट डॉ.सौ. वैशाली देवळे, मदर तेरेसा पुरस्कारप्राप्त राखी काळे यांची उपस्थिती राहील. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नेहा काळे ह्या करतील. तरी या भव्य कार्यक्रमाला राज्यभरातील अल्टरनेटीव्ह मेडीसीन, नॅचरोपॅथी, इलेक्ट्रो होमीयोपॅथी, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंचर, बायोकेमीक, आर्युवेद, हर्बल, नाडी परिक्षण यासह इतर ग्रामीण व शहरी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. माधव हिवाळे यांनी केले आहे.