आशाताई बच्छाव
भरधाव चार चाकी चालवणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दुचाकी स्वारांच्या अपघातामध्ये कमालीची वाढ, यावर कोणी लक्ष देईल का?
वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष
जिल्हा प्रतिनिधी जालना- वसंतराव देशमुख
दिनांक २५/११/२०२४
रात्री महामार्गावरून रस्त्यावरून प्रवास करताना चार चाकी गाडीवाले त्यांच्या मालकीचा रोड असल्यासारखे सुसाट वेगाने गाडी चालवतात .त्यांना आपण किती वेगाने चालतो याचे अजिबात भान नसते यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या टू व्हीलर गाडीवाल्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून अपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ट्रक, टेम्पो, व फोर व्हीलर गाडीवाले यांच्या वेगाला कोणत्याच प्रकारे आवर नसतो त्यामुळे हे सर्व फोर व्हीलर गाडीवाले त्यांच्या मालकीचा रोड असल्याप्रमाणे गाडी चालवतात टू व्हीलर वाल्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना उडवून देण्यात येते .टू व्हीलर गाडीवाल्यांना कट मारतात यामुळे दिवसांदिवस मोठ्या प्रमाणात टू व्हीलर गाडीवाल्यांचे रात्री व दिवसा अपघात वाढले आहे. या अपघातांच्या घटनांकडे महामार्ग पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे.पोलीस रस्त्यावर मधोमध वाहनांना अडवून केवळ आर्थिक वसुली करतांना दिसतात यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.याकडे मात्र पोलीसांचे अजिबात लक्ष नसते ते केवळ वाहन चालकांकडून पैसे वसूल करण्यात व्यस्त असतात असे अनेक वेळा दिसून आले आहे.पोलीसांच्या भितीपोटी अनेक अपघात होण्याची शक्यता असते.पोलीस चोर सोडून संन्याशाला फाशी देतात.चोर मात्र पोलीसांच्या समोरुन निघून जातात अशा वेळी पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतांना दिसतात.पोलीसांच्या अशा भुमिकेमुळे अपघात वाढले आहेत.या घटनांमुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. रात्री जेव्हा टू व्हीलर वाले महामार्गावरून, रस्त्यावरून प्रवास करत असतात तेव्हा फोर व्हीलर गाडीवाल्याकडून त्यांना उडवून देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतांना दिसत आहेत .ज्यावेळी फोर व्हीलर गाडीवाले टू व्हीलर गाडीवाल्याला उडवतात तेव्हा त्याच्या मदतीला तिथे कोणीच नसते व उडवून दिल्यानंतर त्याचा कोणत्याच प्रकारे तपास लागत नाही व टू व्हीलर वाला ज्यावेळी हायवे वरती उडवून दिल्यानंतर पडतो त्यावेळी त्याला मुख्यत्वे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असते त्याला वेळीच उपचार मिळत नाही.रात्री अपघात घडल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी अथवा उपचार मिळवून देण्यासाठी कोणीही मदत करत नाही व तो तडफडून मृत्युमुखी पडतो. ज्यामुळे त्या टू व्हीलर वाल्याचे संपूर्ण कुटुंब रस्त्या येते .दरम्यान रात्री प्रवास करत असताना फोर व्हीलर गाडीवाले त्यांच्या मालकीचा रोड असल्याप्रमाणे प्रचंड वेगाने गाडी चालवतात टू व्हीलर गाडीवाल्यांना कट मारतात, उडवून देतात व या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यामुळे टू व्हीलर गाडीवाल्यांना रात्री जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने रात्री टू व्हीलर गाडीवाल्यांनी प्रवास करावा की नाही असे मोठे संकट आता निर्माण झाले आहे.असताना फोर व्हीलर गाडीवाल्यांच्या वेगाला कोणी आवर घालणार का?असा प्रश्न आता जनसामान्यातून उपस्थित होत आहे.