आशाताई बच्छाव
सतीश घाटगे पाटील सर्वात आदर्श लोकप्रतिनिधी…म्हणून माझा त्यांना पाठींबा – माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड
सतीश घाटगे यांचे व्हिजन जनहिताचे : टोपे, उढाण जनतेच्या प्रश्नांसाठी कधी आले नाही
घनसावंगी/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आग्रहामुळे अपक्ष निवडणूक लढवत असलेले समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांना सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यात मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी देखील मंगळवारी आपला जाहीर पाठिंबा त्यांना दिला आहे. घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील विकासाच्या प्रश्नासाठी सतीश घाटगे हे योग्य उमेदवार असून त्यांच्याकडे शस्वत विकासाचे व्हिजन असल्याने त्यांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी देखील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, काही कारणास्तव त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तिकीट मिळाले नाही म्हणून शांत बसण्याऐवजी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सतीश घाटगे यांना पाठिंबा देत असल्याचे तानी जाहीर केले. हा पाठिंबा जाहीर करताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही संविधानिक पदावर नसताना सतीश घाटगे यांनी केलेले विकासाचे काम, विविध घटकांना केलेली मदत ही एका आदर्श लोकप्रतिनिधीं सारखी आहे. असाच लोकप्रतिनिधी घनसावंगी विधानसभेतील रखडलेले प्रश्न मार्गी लावू शकतो. मराठवाड्यात सतीश घाटगे यांच्यासारखे काम कोणत्याही लोकप्रतिनिधीला करता आलेले नाहीये. कोणत्याही पदावर नसताना त्यांनी केलेले हे काम कौतुकास्पद आहे. अशाच माणसाची घनसावंगी विधानसभेला गरज आहे.