
आशाताई बच्छाव
हातभट्टीवर बसणारा जेव्हा योद्धा होतो कलदार पाटील यांचे वादळी मनोगत
युवा मराठा न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद मतदार संघातील चोंढी टाकळेश्वर येथील कलदार पाटील हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत शंभर एकर त्यांच्याकडे शेती आहे कॉटन मार्केट ची निवडणूक लढून अतिशय कमी मताधिक्याने त्यांचा पराभव झाला होता तसेच गावातील सरपंच पदवी त्यांनी भुषवले आहे नावाप्रमाणे कलदार असून ते कोणाच्याही दबावाला झुगारता काम करतात अशी त्यांची पंचक्रोशीत ख्याती आहे
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ स्वातीताई संदीप वाकेकर यांच्या प्रचारादरम्या चोंढी टाकळेश्वर येथे कॉर्नर सभेमध्ये युवा नेते पुरोगामी विचाराचे खंदे समर्थक कलदार पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान गीताच्या माध्यमातून कर्मयोद्धा जल योद्धा बॉस यांचे वास्तविक स्वरूप निर्भीडपणे जनतेसमोर मांडले महाराष्ट्रातील या अघोषित हुकूमशाहीमध्ये कलदार पाटील यांनी आपले विचार मांडून उपस्थित जनसमुदायाला टाळ्या वाजवण्यासाठी मजबूरच केले त्यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून आपल्याला जडलेलं एक वाईट व्यसन कसं आपल्याला आकाशातून धरतीवर आणू शकते हे अधोरेखित केले आमदार कसा असावा तर बेवडा नसावा. एखादा दारुडा जस आपलं घर सांभाळू शकत नाही तर दारुडा मतदार संघ काय सांभाळणार
इथल्या तरुणांच्या हाताला काम तर नाही उलट त्यांना व्यसनाच्या खाईत लोटण्याचं पाप इथले लोकप्रतिनिधी करत आहे म्हणूनच यावेळी सुसंस्कृत सुस्वाभावी संस्कारीक आमदाराची मतदाराला गरज आहे म्हणून आपण आपली सर्वांची लाडकी बहीण स्वातीताई वाकेकर हिला 50000 च्या लीडने निवडून देऊ अशी शपथस उपस्थित त्यांना घ्यायला लावले जळगाव जामोद मतदारसंघ म्हणजे आपला कोंढाणा किल्ला आहे आणि या कोंढाण्यावर वीस वर्षापासून उदयभान राज्य करत आहे आता या उदय बांधला सत्तेच्या खुर्चीतून खाली ओढण्याची वेळ आली आहे