आशाताई बच्छाव
हिंगोली जिल्ह्यातील आनेक लाडक्या बहिणीचे पैसे अडकले शासन दरबारीच
हिंगोली जिल्ह्यातील अनेक महिलांचे पैसे अडकल्याची चर्चा दिवसेंदिवस रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ
महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीसाठी घेतलेला निर्णय हा जरी महत्त्वपूर्ण असला तरी हिंगोली जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींना भावाची ओवाळणी मात्र दिपवाळी अखेर सुद्धा मिळणार का असाही प्रश्नचिन्ह आता हिंगोली जिल्ह्यातील महिलांच्या समोर उपस्थित झाल्याचे चित्र आज घडीला दिसत आहे ऑनलाइन सेंटरवर अनेक ठिकाणी दररोज महिला माझ्या खात्यात पैसे का पडले नाहीत म्हणून चेकसाठी येतात त्यावेळेस आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर बँकेची जोडला नसल्याची तक्रार ऐकायला मिळत आहे पण एकंदरीत अनेक महिलांनी सर्व कागदपत्रे बँकेकडे पूर्तता केल्यानंतरही संपूर्ण महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप महिलांना त्यांच्या खात्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पण ज्या महिलांना पैसे अद्याप मिळाले नाहीत अशा महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात नाराजीचे सूर उंटायला सुरुवात झाली आहे एकंदरीत राजकीय परिस्थिती आढावा घेऊन राज्य शासनाने जनतेचा खोल होऊ घातलेल्या विधानसभा मतदानातील अधिक पद्धतीने आपल्याकडे व्हावा हा जरी उद्देश असला तरी अनेक महिलांना पैसे न मिळाल्याने महिलांची मात्र आता चांगली दिशाभूल होताना पाहायला मिळत आहे एकंदरीत राज्य शासन गाजावाजा करून दररोजच्या बातम्यांमध्ये अनेक ठिकाणी सत्ताधारी मंत्री आमदार लाडकी बहिणीची मोठा गाजावाजा सुरू असतानाच हिंगोली जिल्ह्यात मात्र अनेक महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे न मिळालेले मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत असताना दिसत आहे
ग्रामीण भागातील महिलांनी दररोजचा उद्योग व्यवसाय सोडून शहराच्या ठिकाणी कधी ऑनलाईन सेंटरवर कधी झेरॉक्स सेंटरवर तर कधी बँकेच्या दरवाजात दिवस बसून त्यांना उपासमारीची वेळ सुद्धा आलेली पाहायला मिळत होती एवढे केल्यानंतरही त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे न आल्याने आता मात्र महिलांमध्ये मोठी राजकीय दुपळी निर्माण होताना पाहिला होत आहे एक तर पैसे आले नाहीत चार चार दिवस उद्योग धंदा बुडून शहराच्या ठिकाणी पदरमोड करून रोजगार महिलांनी वेळ व पैसा वाया गेल्याने त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आज घडीला पाहायला मिळत आहे.