आशाताई बच्छाव
जालना येथील मोर्चा व बंदला अभुतपुर्व प्रतिसाद
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 23/09/2024
जालना शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सोमवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही गोष्टींना जालन्यात अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक 19 सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने ईदमिलादुन्नबी निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत हिंदुच्या दोन दुकानांची तोडफोड करण्यात आली होती.या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने पक्ष विरहित, राजकारण विरहित आज मूक मोर्चा काढण्यात आला आणि बंदही पुकारण्यात आला होता. बडी सडक येथील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करून या मोर्चाला सुरुवात झाली आणि जुना जालन्यातील गांधी चमण येथे हनुमान चालीसा पठणाने या मोर्चाचा समारोप करण्यात आला.
दरम्यान जालनाच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी हिंदू समाजाचे निवेदन स्वीकारले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची ही उपस्थिती होती. निवेदनामध्ये विविध 15 मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दिनांक 19 रोजी ईद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीरामा बद्दल अधिक अस्लिल आणि अपमान जनक गाणे वाजवणाऱ्यांवर कारवाई करावी. भारतात राहून इतर देशाचे झेंडे फडकवणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, उत्तर प्रदेशाप्रमाणेच बुलडोझरची कारवाई करावी, शहरांमध्ये रस्त्यावर नागरिकांना त्रास देणारे झेंडे काढावेत. विविध ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर मदरसे आणि मज्जित हटवावी. चंदनझीरा, कन्हैया नगर, दुखी नगर, रेल्वे स्टेशन, आदि भागामध्ये बांग्लादेशी अवैधपणे राहत आहेत त्यामुळे हिंसक वृत्ती वाढत आहे त्यांचा बंदोबस्त करावा. मुथा बिल्डिंग परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी रस्त्यावरील दुकाने हटवावीत. रात्री 11 नंतर चौकाचौकात जमा होणाऱ्या टोळक्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे त्याला पायबंध घालावा. बाजारात खरेदी करण्यासाठी गेलेल्या हिंदू महिलांची छेड काढल्या जाते त्यांच्याबद्दल द्विअर्थी शब्द वापरून त्यांच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलले जाते या सर्व गोष्टींचे चित्रीकरण पोलिसांना देऊनही पोलीस कारवाई करत नाहीत अशा लोकांवर कारवाई करावी अशा एकूण 15 मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.एकुणच बंद व मोर्चा शांततेत पार पडला.कोणतीही अनुचित घटना घडली नसुन हिंदू समाजाने एक आदर्श निर्माण केला आहे.