Home नांदेड गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या मुक्रमाबाद शहरात ढोल-ताशांच्या गजरात गणपती...

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या मुक्रमाबाद शहरात ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे विसर्जन

109
0

आशाताई बच्छाव

1000760957.jpg

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या मुक्रमाबाद शहरात ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे विसर्जन

मुखेड युवा मराठा न्युज नेटवर्क बस्वराज स्वामी वंटगिरे मुक्रमाबाद

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गणेश उत्सवाच्या परंपरेनुसार म्हणजे ११ व्या दिवशी ता.१७ रोजी मंगळवारी ढोल-ताशांच्या गजरात श्री बाप्पाचे विसर्जन DJ मुक्त फुलांची उधळण करीत पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या जय घोषाणे मिरवणूक निघाली होती.
येथील पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी DJ व गुलाल मुक्त पॅटर्न राबविण्यात आला होता पोलीस प्रशासन कडुन सर्व गणेश मंडळांना फुले वाटप करण्यात आले होते.
तत्पूर्वी सर्वच गणेश मंडळांच्या वतीने विविध उपक्रम राबवून मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या अनेक मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ व महाप्रसादाचे कार्यक्रम करून देखावे सादर केला. शेवटच्या दिवशी गणरायाची महाआरती करून भव्य दिव्य मिरवणुकीस सुरुवात केली. मुक्रमाबाद शहरात एकुण ३० गणरायाची मूर्ती स्थापन करण्यात आली होती त्यापैकी २० परवानाधारक व १० वीनापरवाना धारक गणपती बाप्पा स्थापना करण्यात आली होती. मुक्रमाबाद पोलिस स्टेशन अंतर्गत मुक्रमाबाद शहर व ग्रामीण भागासह पाच टप्प्यात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. अकराव्या दिवशी मुक्रमाबाद येथील श्री गणेश मंडळांच्या सर्व गणेश भक्तांनी वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या च्या जयघोषात मुक्रमाबाद नगरी दुमदुमली होती. मिरवणूक रात्री दहाच्या सुमारास सर्वांनीच एका पाठोपाठ हेमाडपंथी महादेव मंदिराच्या लेंडी नदी तीरावर विसर्जन करण्यात आले मिरवणूक मार्गावर ग्राम पंचायतीच्या वतीने पथदिवे लावण्यात आले होते.
लेंडी नदीच्या काठावर श्री बाप्पाचे चे मोठ्या आनंदी वातावरणात आनंदी उल्हासाने मनोभावे लेंडी नदीच्या काठावर आरती करून बाप्पाला निरोप देण्यात आला. या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व तरूण मंडळी पदाधिकारी, कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच टप्प्यात झालेल्या विसर्जन मिरवणूकीत पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके साहेब यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मुक्रमाबादचे व परीसरातले सर्व गावातील पोलिस पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here