आशाताई बच्छाव
परळीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शिक्षकानेच केला विनयभंग!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि १५ ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या नराधम शिक्षकानेच १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा फायदा घेत विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात शिक्षकांविरोधात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी शहरात मलिकपुरा भागातील एका प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांने शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या ड्रेस मध्ये हात घालून पाठीवर हात फिरविला तसेच ती वाचन करीत असताना तिच्या बोटावर बोट ठेवून हात पकडून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडीलाच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा त्या शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परळी शहर पोलीस करीत आहेत.