
आशाताई बच्छाव
मौजे लोंढेवाडी ता. जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांच्या हस्ते पार पडला.
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे ब्युरो चीफ) लोंढेवाडी गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी गावातील सरपंच निवृत्त लंके यांनी पाठपुरावा करून गावासाठी जलजीवन योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लक्ष्य रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता त्याच प्रमाणे ९५०५ योजने अंतर्गत खंडोबा मंदिर समोर तसेच शिवाजी महाराज चौक ते मारोती मंदिर या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २० लक्ष्य रुपयांचा निधी गावासाठी मा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करुन देण्यात आला होता यावेळी या सर्व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
तसेच गावकऱ्यांच्या मागणी नुसार गावातील स्मशानभूमी जवळ नालीसह सी.सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी १० लक्ष्य रुपये, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सि.सि. स्मशानभूमी रोड चे बांधकाम करण्यासाठी ७ लक्ष्य रूपये व २५१५ योजनेअंतर्गत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लक्ष्य रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे, यावेळी या कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
तसेच शिवशंभू गणेश मंडळ, लोंढेवाडी यांच्या वतीने गावामध्ये एक गाव – एक गणपती या संकल्पनेतून सार्वजनिक गणेशउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी भास्करआबा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच गावकऱ्यांच्या वतीने झालेल्या विकासकामांबद्दल मा. भास्करआबांचे आभार मानले व गावातील काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार गावामध्ये एक सुसज्य असे वाचनालय लवकरच बांधून देऊ असे आश्वासन दिले.