
आशाताई बच्छाव
जि.प.शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षीततेसाठी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवा
– अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन
– उपतालुकाप्रमुख ठोंबरे यांचे सिओंना निवेदन
भोकरदन/ जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: भोकरदन तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींच्याा
सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज ९
सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भोकरदन
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे
यांच्यासह पदाधिकार्यांनी दिली.
सिओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात मुलींच्या
शिक्षणाबाबत अगोदरच पालकांची उदासिनता त्या नंतर शाळेमध्ये मुलींसाठी
विधायक सोईसुविधांचा अभाव, समाज मनावर जुण्या रुढी परंपराचे प्राबल्य अशा
परिस्थीतीत बदलापुर सारख्या असंख्य घडणार्या घटना यामुळे प्राथमिक व
माध्यमिक जि.प.शाळामध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलेला
दिसुन येतो. अनेक शाळामध्ये रक्षकच मुलींचे भक्षक बनत असल्याचे प्रकरणे व
त्यामुळे पालकांच्या मनामध्ये मुलींच्या संरक्षणाविषयी वाढत जाणारी काळजी
यामुळे शाळेतील मुलींची गळती वाढू शकते. या सर्व बाबींचा विचार करून
भोकरदन तालुक्यातील सर्व जि.प.शाळामध्ये सिसीटीव्ही कॅमेरे बसुन ग्रामीण
भागातील मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने तात्काळ उचलावी आणि
शाळेतील मुलींची गळती रोखण्यासाठी विधायक स्वरुपाचे प्रयत्न करावे.
अन्यथा मुला-मुलींचे सुरक्षीततेसाठी व भविष्य अबाधीत ठेवण्यासाठी शिवसेना
रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देत या बाबत तात्काळ १५
दिवसाच्या आत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र
स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपतालुकाप्रमुख अर्जुन
ठोंबरे यांनी दिला. यावेळी राजु विर, संजय जाधव