आशाताई बच्छाव
खळबळजनक: मालेगाव महानगरपालिकेत मोठा भूकंप! २१ लाखांचे घबाड लुटताना १५ अटकेत!!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव,दि.२६:- भ्रष्टाचाराने पुन्हा डोके वर काढले असून,सरकारी, सहकारी, निमसरकारी सगळेच खाबुगिरीत तरबेज झाले आहेत.टेबलाखालुन घेतल्याशिवाय कुठलेही काम होत नाही,हा सर्वसामान्यांचा आजवरचा अनुभव आहे.असाच काहिसा प्रकार काल रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास नाशिकच्या मालेगाव शहरात घडल्याने मोठीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शासनाच्या वतीने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकारी कैलास बच्छाव, मुरलीधर देवरे, संजय जाधव, राजेंद्र बाविस्कर, दिनेश जगताप, निलेश जाधव, अशोक म्हसदे, सुहास कुलकर्णी,कमरुद्दीन शेख, सुनील खडके, मधुकर चौधरी,उत्तम कावडे,केदा भामरे, कृष्णा वळवी, यांनी खाजगी कंपनीचा ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासुम अली यास नेमून दिलेल्या कामाची प्रतवारी तपासून मुल्यमापन न करता सोहेल अब्दुल रहेमान मासुम अली यांच्या बी.वाय.शहा फर्मला २० लाख ६८ हजार ६ सहाशे सात रुपयांचा अपहार करून शासनानचे व महानगरपालिकेचे नुकसान केले म्हणून भ्रष्टाचार प्रतिबंधक सन १९८८ चे कलम १३(१) (अ)सह व भा.दं.वि.कलम ४०९,४२०,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत असून, पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर व माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.