आशाताई बच्छाव
हिंगोली जिल्ह्यातील उत्तरकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोरावा येथील उत्तरेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी हिंगोली,श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ
उत्तर काशी म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर परभणी रोडवर थोरावा गाव लागते या गावांमध्ये गावाच्या पश्चिम दिशेला स्वयंभू शिवलिंग असून हे शिवलिंग गेल्या अनेक पिढ्यांपासून दीड-दोनशे गावातील नागरिक भक्तांचा जनसागर या ठिकाणी श्रावण मासानिमित्त कार्तिकी निमित्त व त्याचबरोबर चित्र महिन्यातील आपल्यावर्षीच्या निमित्ताने या गावात मोठे कार्यक्रम मंदिर संस्थानात होत असतात या ठिकाणी गावातील छोटे मोठे लग्न सामुहिक कार्यक्रम त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा शिवपुराण अशा हिंदू धार्मिक कथेचे वाचनही या ठिकाणी केले जाते. एकूणच चार एकर क्षेत्रावर मंदिर परिसरातील जागा मंदिर संस्थांची असून या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागच्या साईटला मोठ्या प्रमाणात मंगल कार्याची बांधकाम उभारणी सुरू असल्याचे पाहायला मिळते त्याचबरोबर एकूणच मंदिर संस्थांना मंदिर संस्थांच्या विकासासाठी मंदिराची 35 36 एकर जमीन असून त्यातून मिळालेले उत्पादन हे मंदिराच्या विविध कामासाठी दरवर्षी अन्नदानासाठी वापरली जाते त्याचबरोबर शंभर ते दीडशे गावातील आराध्य दैवत म्हणून मानलेले जाते स्वयंभू महादेव मंदिरात पूजा विधी करण्यासाठी शुभ कार्य शुभमंगल कार्य असल्यास प्रथम पुजा होते. दीडशे गावातील भक्त आपल्याघरी शुभकार्य असल्यास पूंज्याचा प्रथममान या स्वयंभू महादेव मंदिर पुजा नंतरच सुरू होतो नवयुवाईक दांपत्य लग्न समारंभ संपल्यानंतर प्रथम नववधु दर्शनासाठी व पूजेसाठी या ठिकाणी येत असतात . मंदिराचे हेमडपंथी बांधकाम असून जमिनीपासून दहा ते बारा फूट खोल अंतरावर स्वयंभू भगवान शंकराची एक उत्तर मुखी मोठ्या प्रमाणात पिंड पाहायला मिळते अरुंद जागेतून जाऊन महिला पुरुष नवतरुण दर्शनाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभ घेत असतात उत्तरेश्वर महादेव मंदिर येथील महंत महाराज नित्यनेमाने दोन वेळचे पूजा विधी नैवेद्य करत असतात सकाळी काकडा आरती भजन व सायंकाळी भजनाचा सुद्धा कार्यक्रम होत असतो