आशाताई बच्छाव
शासनाला चुना! गौण खनिज उत्खननावर वरदहस्त कुणाचा? -तहसीलदारांनी सील केलेली गिट्टी खादान सुरू झाली कशी?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मेहकर तालुक्यातील घाटबोरी वनपरिक्षेत्रांतर्गत हिवरा खुर्द येथील गट क्रमांक 538 या वनक्षेत्रातील गिट्टी खदान मेहकर येथील तहसीलदारांनी सील केली होती. परंतु ती पुन्हा सुरू झाली कशी? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अवैधपणे गौण खनिज उत्खनन करून शासनाला चुना लावण्याचे काम केल्या जात असल्यामुळे कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शासनाच्या व प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अवैधपणे जिल्ह्यात गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे चित्र आहे. हिवरा खुर्द येथील गट क्रमांक 538 या वनक्षेत्रातील गिट्टी खदान मेहकर
येथील तहसीलदारांनी सील केली होती. परंतु ती पुन्हा सुरू झाली आहे. याप्रकरणी कारवाईसाठी कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी येवले यांच्याकडे बळीराम काशीराम राठोड यांनी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. दरम्यान आर एफ ओ येवले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. दरम्यान देऊळगाव साखरशा परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी कर्मचारी गेले असता, ट्रॅक्टर फरार झाले. याप्रकरणावर आर एफ ओ येवले लक्ष ठेवून असले तरी, गौण खनिज उत्खननावर वरदहस्त कुणाचा? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.