Home भंडारा इंजि.रूपचंद रामटेके शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

इंजि.रूपचंद रामटेके शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

56
0

आशाताई बच्छाव

1000677405.jpg

इंजि.रूपचंद रामटेके शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) विविध सामाजिक ,शैक्षणिक ,क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचा दिनांक 21 ऑगस्ट 2024 ला तालुका सिन्नर जिल्हा जिल्हा नाशिक येथे संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यातील विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .सदर कार्यक्रम प्रसंगी पद्मश्री राईबाई पोपेटे ,भाऊसाहेब् वाघचौरे लोकसभा सदस्य शिर्डी ,रविकांत तुपकर अध्यक्ष वस्त्रोद्योग महामंडळ ,माणिकराव कोकाटे विधानसभा सदस्य ,रवीराम गायकवाड पाटील ,उदय सांगळे ,रोहिदास वाघचौरे,डॉ. ज्ञानेश्वर सानप चेअरमन संजीवनी फाउंडेशन इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या भंडारा येथील इंजिनीयर रूपचंद रामटेके यांच्या कार्याची दखल घेऊन शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव 2024 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. इंजिनीयर रूपचंद रामटेके हे शासकीय सेवेत कार्यरत असताना सामाजिक समता ,जातीय सलोखा वृद्धिगत करण्याकरिता सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग दर्शविले. विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठावे याकरिता विविध शाळेत जाऊन मार्गदर्शन करणे व होतकरू विद्यार्थ्यांकरता इंग्रजी व्याकरणाचे वर्ग चालवून , भटक्या व विमुक्त जमातीच्या नागरिकांना निवाऱ्याची व्यवस्था व्हावी म्हणून झोपड्या बांधून दिल्या .सर्व महिलांना साड्या, मुला मुलींना नवीन कपडे ,तसेच त्यांच्या मुला मुलींचे जन्माचे दाखले तयार करून त्यांना आश्रम शाळेत दाखल केले .ग्रामीण भागातील गरीब, गरजू ,होतकरू विद्यार्थ्यांना पोषक आहार, नोटबुक, पुस्तके , ब्लॅंकेट,वाटप करणे तसेच आर्थिक मदत करणे ,शालेय शिक्षण जनजागृती अभियानांतर्गत 2014 पासून आज पर्यंत जिल्ह्यातील जवळ जवळ 90 गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करून शैक्षणिक अभियान राबविले. सध्या जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण व पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद होऊ नये म्हणून गावागावात जाऊन लोकांना संविधानिक हक्का नुसार जागृत करण्याचे कार्य अविरत सुरू केलेले आहे . यांचे संपूर्ण परोपकाराची दखल घेऊन राज्यातील, देशातील ,विविध संस्थांनी दखल घेऊन विविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. या अगोदर इंजिनिअर रूपचंद रामटेके यांना अण्णाभाऊ साठे सामाजिक पुरस्कार, धम्मभूषण ,व समाज भूषण समाज, कल्याण विभागामार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज सेवक पुरस्कार ,आदर्श कार्य गौरव पुरस्कार ,नवी दिल्ली संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार ,ओबीसी सेवा संघ भंडारा कडून मंडल आयोग सन्मान पुरस्कार ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार, प्रतिभा सन्मान गोल्डन पिकप 2021 सामाजिक कार्य गौरव पुरस्कार, भारत सेवा पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले ग्लोबल प्राइड समाज अवॉर्ड ,तसेच भंडारा तर्फे नागरी सत्कार इत्यादी पुरस्काराने इंजिनीयर रूपचंद रामटेके यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, साहित्यिक अमृत बनसोड, भारत गोंडाने ,रवी शेंडे, यांनी अभिनंदन केलेले आहे.

Previous articleनाशिकच्या भगूरमध्ये मुंजाबाबा देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन
Next articleवसमत शहरातील दुकानदार व दुचाकी स्वार यांना नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here