Home उतर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळातील कायदे आणण्याची गरज- तिलक डुंगरवाल

छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळातील कायदे आणण्याची गरज- तिलक डुंगरवाल

24
0

आशाताई बच्छाव

1000670780.jpg

छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या
काळातील कायदे आणण्याची गरज- तिलक डुंगरवाल

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-कोलकाता इथं डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणानं देश हादरला, ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे बदलापूर शहरातील एका शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याची घटना समोर आली. संतापजनक अशा या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. शाळेत गेलेल्या चिमुकल्या लेकींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले. या प्रकरणातल्या आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले
यावेळी तिलक डुंगरवाल म्हणाले की कोलकाता इथं डॉक्टर तरुणीवरील बलात्कार ही घटना ताजी असताना बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला अशा अनेक घटना भारतासह महाराष्ट्रामध्ये घडत आहे या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे, शाळा ही मुलांसाठी स्वत:च्या घरा इतकीच सुरक्षित अशी जागा असायला हवी. या प्रकरणात या नराधमाला, राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात दोषींना ज्या प्रकारे शिक्षा द्यायचे, चौरंग – हेच कायदे आपल्याला पुन्हा आणण्याची गरज आहे.’
म्हणजे यापुढे कोणाचीही हिंमत होणार नाही,
विकास डेंगळे म्हणाले की एक पालक म्हणून मी खूप दुखावलोय,आणि प्रचंड संताप होतोय.अत्यंत लाजिरवाणी ही घटना आहे आरोपींना खडक शासन व्हावा याकरता ही केस फास्ट ट्रॅक वर चालू आरोपीला आता फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच शैक्षणिक शाळांमधील विद्यार्थी सुरक्षित राहण्यासाठी योग्य ते कायदे करून अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी आपचे मा उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवारल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, भैरव शेठ मोरे, मनोज गाडे, भरत डेंगळे, संदेश बोर्डे, राहुल रणपिसे, प्रशांत बागुल, डॉ प्रवीण राठोड, श्रीराम दळवी, अभिजीत राऊत, विवेक साबळे, दिनेश यादव,जयेश कांदळकर, प्रदीप उंडे, आदी उपस्थित होते

Previous articleयुवा मराठा ब्रेकिंग पलढग धरण ओर फ्लो…..
Next articleमाजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी चुटुगुंट्टा,दामपूर येथील सभा मंडप बांधकामासाठी केली आर्थिक मदत!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here