Home उतर महाराष्ट्र नेवासा – घंटानाद, वीज बिल बहिष्कार आंदोलनाचा ‘आप’चा इशारा

नेवासा – घंटानाद, वीज बिल बहिष्कार आंदोलनाचा ‘आप’चा इशारा

24
0

आशाताई बच्छाव

1000665433.jpg

नेवासा – घंटानाद, वीज बिल बहिष्कार आंदोलनाचा ‘आप’चा इशारा

नेवासा आम् आदमी पार्टीचे महावितरणला निवेदन : पंधरा दिवसांत कारभार न सुधारल्यास आंदोलन छेडणार

 

नेवासा (प्रतिनिधी कारभारी गव्हाणे) – महावितरण प्रशासनाच्या गलथान, भ्रष्ट कारभारामुळेच तालुक्यात वीज वितरणाचा फज्जा उडाल्याचा आरोप आम् आदमी पार्टीने केला असून पंधरा दिवसांत यात कायमस्वरूपी सुधारणा न झाल्यास घंटानाद, धरणे व वीज बीलावर बहिष्कार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात नेवासा आम् आदमी पार्टीने महावितरणच्या नेवासा आणि घोडेगाव उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्याच्या जवळ जवळ सर्वच भागांत वीज वितरणाचा पुरता फज्जा उडाला आहे. तालुक्याला अनियमित तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजेची समस्या भेडसावत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने महावितरणचे घरगुती ग्राहकांसह विविध व्यावसायिक तसेच कृषी ग्राहक पुरते त्रस्त बनले आहेत. रात्रंदिवस सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे सामान्य ग्राहकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यात अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने पिकांना विहीर, बोअर मधून पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. परंतु विजेच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होत असल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुक्यात मोठा पाऊस झालेला नसला तरी साध्या रीम झिम पावसातही वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणचे वाभाडे निघत असल्याकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
या सर्व अनागोंदीस महावितरण प्रशासनाचा सावळा गोंधळ जबाबदार असल्याचा सडेतोड गंभीर आरोप आप ने या निवेदनाद्वारे केला असून तालुक्यातील बहुतांश वीज वितरण प्रणाली कालबाह्य झाली असून ती दिवसेंदिवस विजेच्या वाढत्या मागणीच्या प्रमाणात विद्युत भार सहन करण्यात असमर्थ बनल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. वीज वितरण प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च कागदावर दिसत असला तरी प्रत्यक्षात केलाच जात नसल्याने तालुक्यातील वीज वितरणाची परिस्थिती अधिकच बिकट बनली असून याला मोठा कालावधी उलटून जाऊनही विजेचा लपंडाव थांबत नसल्याने नाईलाजाने आंदोलनात्मक पावित्रा घ्यावा लागत असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
येत्या पंधरा दिवसांत तालुक्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम होऊन लपंडाव न थांबल्यास येत्या दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून आम्ही तालुक्यातील वीज ग्राहकांना वीज बिलावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणार असून आपल्या नेवासा आणि घोडेगाव या दोन्ही उपविभागीय कार्यालयात घंटानाद, बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा नेवासा आप च्या वतीने देण्यात आला असून याप्रश्नी लोकभावना तीव्र असल्याने आंदोलनादरम्यान काही अप्रिय घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनावर राहण्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
महावितरणचे नेवासा उपविभागीय अभियंता राहुल बडवे यांना आम् आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड. सादिक शिलेदार, सचिव प्रवीण तिरोडकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब लोंढे, देवराम सरोदे, मुन्ना आतार, विठ्ठल चांडे, सुमित पटारे, भाऊसाहेब बेल्हेकर, नेवासा शहराध्यक्ष संदीप आलवणे, विठ्ठल मैंदाड, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख सलीम सय्यद, करीम सय्यद, संघटक किरण भालेराव, संजय साळवे, आदींनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here