Home बुलढाणा अब हम बोले तो बोले क्या? गायत्री शिंगणेचे शिष्ट मंडळ कर्जत शिरूर...

अब हम बोले तो बोले क्या? गायत्री शिंगणेचे शिष्ट मंडळ कर्जत शिरूर व बीड ला… डॉ. राजेंद्र शिंगणे डायरेक्ट शरद पवारांच्या कार्यक्रमात वर्ध्याला..

30
0

आशाताई बच्छाव

1000655563.jpg

अब हम बोले तो बोले क्या? गायत्री शिंगणेचे शिष्ट मंडळ कर्जत शिरूर व बीड ला… डॉ. राजेंद्र शिंगणे डायरेक्ट शरद पवारांच्या कार्यक्रमात वर्ध्याला..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा
राष्ट्रवादीतील दोन गटात तळ्यात मळ्यात असा खेळ सुरू आहे. शरद पवार गटात जाऊन त्यांना गायत्री शिंगणे यांनी जेरीस आणले आहे. दरम्यान डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना पश्चाताप होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतदार’अब हम बोले तो बोले क्या?’ या संभ्रमात दिसून येत आहे.
परवा मुंबई येथे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक उद्धव ठाकरे, शरद पवार, तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीतून ‘काहीतरी” मिळवून घरी निघालेल्या गायत्री शिंगणे या
मुंबईवरून घरी परत येण्या अगोदरच गायत्री शिंगणे यांचे बंधू गौरव शिंगणे व सिंदखेड राजा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उत्साहित कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ कर्जत जामखेड येथे जावून आ. रोहित पवार तसेच खा. अमोल कोल्हे यांना भेटले, बिडचे फायरब्रँड आमदार संदीप क्षीरसागर यांची भेट घेऊन, गायत्री शिंगणे यांचा कार्य अहवाल त्यांनी वरील तिघांनाही दिला व या तिघाकडून काही “गुप्त लखोटे” घेऊन गायत्री शिंगणे आपल्या मतदारसंघात पोहचल्या.
तर आज वर्धा येथे शरद पवार यांच्या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपली उपस्थिती
लावली. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता आपल्या राजकीय जडणघडणीमध्ये माननीय शरद पवार यांचा प्रमुख वाटा राहिला असून आपण जन्मभर त्यांच्या कायम ऋणातच राहू इच्छितो असे डॉक्टर शिंगणे म्हणाले. सहकारी बँक वाचवण्यासाठी अजित पवार गटात “नाईलाजाने” गेलो असेही ते माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. मागील एक महिन्यापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे जे अप्रत्यक्षपणे शरद पवार गटाविषयी बोलत होते, आता प्रत्यक्ष शरद पवारांच्या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीने काय बोलाव हेच समजत नाही. त्यामुळे सिंदखेडराजा मतदारसंघातील सर्व मतदार नक्कीच म्हणत असतील…. अब हम बोले तो क्या बोले…

Previous articleअंढेरा फाट्याजवळ ॲपे व रोहीच्या धडकेत महिला ठार चार जण गंभीर…
Next articleबोराखेडी वार्ड नंबर 5 मधील रस्ता व खड्याच्या दुरुस्ती करिता गटविकास अधिकारी मोताळा यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here