Home नाशिक लाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका –...

लाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – आ. आहेर

51
0

आशाताई बच्छाव

1000606209.jpg

लाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – आ. आहेर

सतीश सावंत – प्रतिनिधी : देवळा

“नाशिक जिल्ह्यात देवळा-चांदवड विधानसभा क्षेत्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे सर्वाधिक काम झाले असून, आतापर्यंत देवळा तालुक्यातून जवळपास १९ हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तालूक्यात या योजनेची प्रभावी अंलबजवणी होण्यासाठी प्रशासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून, याचा महिलांनी लाभ घ्यावा व विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका”, असे प्रतिपादन आमदार डॉ राहुल आहेर यांनी केले. १ ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून देवळा येथे देवळा नगरपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. गट-तट विसरून कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या राबवण्यासाठी सक्रिय व्हावे – आ. आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक जितेंद्र आहेर होते. यावेळी आमदार डॉ. आहेर पुढे म्हणाले कि, “राज्यात महायुती सरकारने शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी एक ना अनेक योजना हाती घेतल्या असून, यातून वर्षाकाठी अनुदान स्वरूपात जवळपास ४८ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले असून, येत्या तीन चार वर्षात सर्व विद्युत उपकरणे सोलरवर चालणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आता वर्षाकाठी तीन गॅस सिलेंडरदेखील मोफत दिले जाणार आहेत. या योजनेत एकही महिला वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारने यातील निकष बदले आहेत. फॉर्म भरताना एक रुपयादेखील खर्च नाही. तालुक्यातून या योजनेला महिला वर्गाकडून उस्त्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार असून, याकामी प्रशासकीय पातळीवर जास्तीत जास्त महिलांचे अर्ज प्राप्त कसे होतील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे यावेळी ते म्हणाले.

नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, नगरसेवक जितेंद्र आहेर, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोज आहेर, गटनेते संभाजी आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, किशोर आहेर, दिलीप आहेर, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, गटविकास अधिकारी भरत वेंदे, आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक तसेच आदींसह लाभार्थी महिला, नगरसेवक, तलाठी, ग्रामसेवक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, बचत गटाच्या महिला, रेशन दुकानदार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आदी उपस्थित होते.

Previous articleवसाका विक्री न करता भाडे करारावर द्यावा; आ. आहेरांसह शिष्टमंडळाची अजित पवारांकडे मागणी
Next articleरघु नवरे यांच्याकडून बागलाण विधानसभेसाठी तयारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here