Home रायगड पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन

पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन

26
0

आशाताई बच्छाव

1000559257.jpg

पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

रायगडसाठी एक आनंदाची बातमी असून पेणच्या गणपतीं मुर्ती भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे पेणसह जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समिती भवनात आयोजित कार्यक्रमात भौगोलिक मानांकन पेणच्या गणपती व्यवसायिकांना बहाल केले आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींना आता स्वतची ओळख निर्माण झाली आहे.
पेण हे गणरायाचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे. पेणच्या गणपतींना देशासह जगभरातून मोठी मागणी असते. अनेक कुटुंब गणेश मूर्ती बनविण्याच्या व्यवसायात पिढ्यानपिढ्या काम करीत आहेत. वर्षभर गणपती कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते. त्यामुळे स्थानिक कलाकारांच्या हाताला रोजगार निर्मिती झाली आहे. या व्यवसायातून पेण तालुक्यात करोडो ची उलाढाल दरवर्षी होत असते.
पेणचे गणपती हे प्रसिद्ध असल्याने काहीजण पेणच्या नावाने गणेश मूर्ती विक्री व्यवसाय करून ग्राहकांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे पेणच्या गणराय व्यवसायिक यांना फटका बसत होता. यासाठी गणपती व्यवसायिक यांनी दीड वर्षापूर्वी पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याच्या या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने पेणच्या गणपतीला भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र दिले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती भवनात एका कार्यक्रमात प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामुळे पेणच्या गणपती मूर्तीना आता स्वतः ची ओळख निर्माण झाली आहे.

Previous articleपेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन
Next articleचाळीसगावात तरूणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न – 6 जणांवर गुन्हा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here