Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचे पंढरपूर कौन्दन्य पुरात हजारावर भाविकांची मांदियाळी, दात्यांकडून भाविकांना फराळाचे...

अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचे पंढरपूर कौन्दन्य पुरात हजारावर भाविकांची मांदियाळी, दात्यांकडून भाविकांना फराळाचे वितरण.

28
0

आशाताई बच्छाव

1000559221.jpg

अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचे पंढरपूर कौन्दन्य पुरात हजारावर भाविकांची मांदियाळी, दात्यांकडून भाविकांना फराळाचे वितरण.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
कौंडण्यपुर,(अमरावती)
अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणी मातेचे माहेर येथून कृष्ण देवाने माता रुक्मिणीचे हरण ज्या ठिकाणी येऊन केले होते त्या कौंडण्यपुरला विदर्भाची पंढरपूर म्हणतात. बुधवारी १७ जुलैला आषाढी एकादशीला येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानात मोठा उत्सव भरला. टाळ मृदुंगाचा गजर, महिला तर्फे गायली जाणारी विठ्ठलाची गाणी व भजने, कदम तालुका असे या मंदिर परिसराचे चित्र होते. संस्थांचे अध्यक्ष ना.बा. अमाळकर, इतर पदार्थ धिकाऱ्यांच्या उपस्थित ज्येष्ठ विश्वस्त सत्यनारायण चांडक यांनी पहाटे ६ वाजता सपत्नीक विठ्ठल रुक्माई ची महापूजा व अभिषेक केला. त्यानंतर भाविकासाठी मंदिर खुले केले त्यानंतर भाविकासाठी तेव्हापासून ते रात्रीचे ८ नंतरही भाविकांची दर्शनाची गर्दी होती. अधून मधून पावसाचा रिमझिम सुरू असल्याने काही काळापूर्ती ही गर्दी असते झाली होती. परंतु पाऊस बंद झाल्यावर पुन्हा ती जैसे थे दर्शनाची गर्दी होती. अध्यक्ष, मंदिराचे विश्वस्त अतुल ठाकरे व प्रशांत गावंडे यांच्या मते दिवसभरात किमान २५ हजारावर उर्वरित भक्तांनी उपासाचा फराळाचा स्वाद घेतला शंकर निखाडे म्हणाले की आम्ही सरकारकडून काहीही घेत नाही. लोकांमधील दानदातेच हे संस्थान चालवतात. दररोज गुप्त दान येते. भाविकांच्या देंगे सुरू असतात. त्यामुळे विठू माऊलीच्या कृपेने काहीही कमी पडत नाही. मंदिराच्या भक्त निवासात २३ खोल आहेत. त्या भक्तासाठी खुले असतात. दोन दिवसांपूर्वीच भंडाराच्या एका भक्ताने ५ लाखाचे दोन दोन लाखाचे एक धनादेश दिला. नाव सार्वजनिक करतो म्हटलं तर त्यांनी नकार दिला. एवढी मातेच्या श्रद्धा पोटी या संस्थेवर विश्वास आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला येथे येणारा वेळ घाट मधील मोथा ग्रामीण वासी तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती येथील भक्त शंकर निखाडे म्हणाले की कुठल्याही प्रकारचा कंटाळा किंवा त्रास न होता सारा बचाव पांडुरंगाच्या हाती असून तोच आमच्याकडून कार्य करून घेतो. आमच्यावर कितीही संकट आले तरी तोच आलता राखण करतो व आमचा अतूट विश्वास श्रद्धा आहे. असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत सहदेव चव्हाण, शंकर हेकळे, सोनू खडके, गोंदू येवले, नारायण शनिवारे हे पण या गोष्टीची सहमती दर्शवत होते. हे सर्वजण शेतकरी व पशुपालक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here