आशाताई बच्छाव
मुंबई येथे बहुजन समाज पार्टीच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मुंबई पोलिसात तक्रार दाखल
मुंबई (संजीव भांबोरे) दिनांक 17 जुलै 2024 ला मुंबई दादर येथील राज्यस्तरीय सभेमध्ये पदाधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम सुरू असताना बहुजन समाज पार्टीच्या भंडारा-गोंदिया लोकसभेच्या माजी प्रभारी निमा मोहरकर ( रंगारी) ह्या स्वागत करिता असताना यांना बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी शिवीगाळ करून सभागृहातून बाहेर काढा असे कार्यकर्त्यांना सांगितले. त्या सभेत उपस्थित असलेल्या उमेश मेश्राम यांनी सुद्धा
धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे सोडवायला गेलेल्या अविनाश रंगारी यांना सुद्धा हाताने मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे त्यांनी दादर मुंबई येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उमेश मेश्राम व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनील डोंगरे व यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली .यापूर्वीच महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीचे दिवसेंदिवस खच्चीकरण होत आहे व त्यापासून समाज दूर जात आहे. परंतु निव्वळ पदाकरिता बहुजन समाज पार्टीत रस्सीखेच सुरू असून निवडणूक आल्या की कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला पक्ष टिकविण्याकरता कोणत्याही पक्षाशी युती न करता सर्वच जागा लढवतात दिवसेंदिवस बहुजन समाज पार्टीतून बरेच कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. परंतु आता सुद्धा पक्षातून कार्यकर्त्यांची हकालपट्टी करणे सुरू झाले आहे .त्यामुळे येणाऱ्या काळात बहुजन समाज पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार होणार आहे याची सुद्धा पक्षश्रेष्ठींनी जाणीव ठेवावी.