Home रायगड पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यालगत किनेश्वरवाडी रस्त्यावर कोसळले दरडींसोबत महाकाय दगड

पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यालगत किनेश्वरवाडी रस्त्यावर कोसळले दरडींसोबत महाकाय दगड

30
0

आशाताई बच्छाव

1000557253.jpg

पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यालगत किनेश्वरवाडी रस्त्यावर कोसळले दरडींसोबत महाकाय दगड

युवा मराठा न्यूज रायगड प्रतिनिधी :- मुजाहिद मोमीन

तालुक्यातील किनेश्वरवाडी येथे नियोजित धरणासाठी ठेकेदाराकडून सेवानिवृत्त महसूली अधिकारी व खासगी व्यक्तींमार्फत जमिनीची मोठया प्रमाणात खरेदी करण्यात आल्यानंतर ‘गुगल मॅप’वर ज्या भागाचा ‘इन्व्हेस्टर पॉईंट’ असा उल्लेख येऊ लागला आहे; त्या किनेश्वरवाडीच्या रस्त्यावर मातीच्या ढिगाऱ्यासोबत महाकाय दगड कोसळल्याची घटना झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तहसिलदार कपिल घोरपडे आणि पोलीस ठाण्यातील हवालदार स्वप्नील कदम यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांना दरडीच्या धोक्याची कल्पना देऊन सुरक्षितस्थळी मुक्कामी राहण्यास आवाहन केले.

पोलादपूर तालुक्यातील किनेश्वरवाडी येथील नियोजित धरणासाठी 2009 मध्ये लघुपाटबंधारे विभागामार्फत कार्यक्रम तयार करण्यात येऊन अनुकूलता दर्शक अहवाल तयार करण्यात आल्यानंतर या भागातील धरणासाठी संपादित करण्यात येणाऱ्या संभाव्य जमिनींचे मोठ्या प्रमाणात खरेदी व्यवहार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत तसेच खासगी व्यक्तींमार्फत करण्यात आल्याने या क्षेत्रासाठी ‘गुगल मॅप’ या ऍपवर ‘इन्व्हेस्टर पॉईंट’ असा उल्लेख येऊ लागला आहे.

याठिकाणी किनेश्वर ते किनेश्वरवाडी हा रस्तादेखील भूसंपादनाचा मोबदला अदा केल्याविना करण्याचे काम सुरू झाले होते. आड चांभारगणी येथून साधारणपणे 150 मीटर अंतरावरील रस्त्यावर लगतच्या डोंगरातून लाल मातीचे ढिगारे आणि तीन महाकाय दगड कोसळून दरडप्रवण क्षेत्र निर्माण झाले. यामुळे गावाला धोका निर्माण होऊन तहसिलदार कपिल घोरपडे यांनी 17 कुटूंबांपैकी 7 कुटूंबातील 24 सदस्यांना किनेश्वरवाडी अंगणवाडी येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले.

यावेळी अंगणवाडीचा खंडीत करण्यात आलेला विद्युतपुरवठा सुरळीत करून या ग्रामस्थांना रात्री दिवाबत्तीच्या उजेडामध्ये राहण्याची सुविधा केली. तहसिलदार घोरपडे यांच्यासोबत महसूली कर्मचारी देखील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी सहभागी झाले होते. हा किनेश्वर ते किनेश्वरवाडी रस्ता बॅरिकेटस् टाकून वाहतुकीस बंद करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना आड ते किनेश्वर मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा लागणार आहे.

Previous articleपश्चिम मुखी विश्वशनिदेव मंदिर कांलीका देवी फाटा जवळ शाबुदाना खिचडीचे वाटप .
Next articleपत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार संवाद यात्रेचे भागीदार व्हा- नयन मोंढे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here