Home भंडारा भेल प्रकल्प सुरू करण्यात यावा याकरिता 9 जुलैपासून साखळी पासून सुरू –...

भेल प्रकल्प सुरू करण्यात यावा याकरिता 9 जुलैपासून साखळी पासून सुरू – प्रशासनाचे दुर्लक्ष

154
0

आशाताई बच्छाव

1000556194.jpg

भेल प्रकल्प सुरू करण्यात यावा याकरिता 9 जुलैपासून साखळी पासून सुरू – प्रशासनाचे दुर्लक्ष

उपोषण मंडपाला भेट देऊन वंचित ने दर्शविला पाठिंबा

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यातील साकोली तालुका येथील मुंडीपार, बाह्मणी/खैरी येथील ४७६ एकर जागा २०१३ साली, शासनाने शेतकऱ्यांकडून भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) ह्या प्रकल्पासाठी अधिकग्रहीत केली. पण अद्याप ही सदर जागेवर प्रकल्प तयार झाला नाही. भेळ प्रकल्प सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणी करिता 9 जुलै 2024 पासून शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत साखळी आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे भेल प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी प्रतिनिधीला सांगितले. आज साखळी उपोषणाला 8 दिवस होत आहेत परंतु शासनाने कोणती दखल घेतलेली नाही. दिनांक 13/07/2024 ला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत, ह्या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत वंचित बहुजन महिला आघाडी भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष तनुजा अमित नागदेवे भेट देऊन भेल कंपनी सुरू करा किंवा या जागेवर शेतकऱ्यांना शेती तरी करू द्या यातच एका प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्याने कीटकनाशक औषधी प्राशन करून आत्महत्यांचा प्रयत्न केला होता .
शासनाने या भेल प्रकल्पाकडे त्वरित लक्ष केंद्रित प्रकल्पग्रस्त पिंपळगाव बामनी, खैरी, मुंडेपार ह्या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात .कारण या गावातील लोकांची जमीन प्रकल्पामध्ये गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मुले बेरोजगार झाली उत्पन्नाचे साधन हिरावून घेतल्यामुळे त्याला काम त्यामुळे उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे हा प्रकल्पाविषयी काही घेणे देणे नाही. या जिल्ह्यात राजकीय मोठे मोठे नेते आहेत. तरीपण एकाही मोठ्या नेत्यांनी आवाज उचलला नाही . भेल प्रकल्प शेतकरी संघटना समितीचे अध्यक्ष व सरपंच विजय नवखरे, पिंपळगावचे सरपंच श्याम शिवणकर ,प्रदीप मेश्राम ग्रामपंचायत सदस्य ,पवन तवाडे ,सिंधुबाई नवखरे ,अशोक दिगोरे ,शेखराम बेदरकर, कृष्णा रोकडे,
, मुकेश मेनपाले, परमानंद मेनपाले महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे ,जिल्हा सहसचिव यादोराव गणवीर, लाखनी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे ,साकोली तालुका महासचिव अमित नागदेवे, गणेश गजभिये ,कांता गजभिये आदी उपस्थित होते.
अन्यथा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार आहे करणार असल्याचे जिल्हा महिला वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष तनुजा नागदिवे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here