Home रायगड मुरुड तालुक्यात मागील आठवड्यापासून पावसाने आज दमदार जोर धरला

मुरुड तालुक्यात मागील आठवड्यापासून पावसाने आज दमदार जोर धरला

43
0

आशाताई बच्छाव

1000544212.jpg

मुरुड तालुक्यात मागील आठवड्यापासून पावसाने आज दमदार जोर धरला

युवा मराठा न्यूज अलिबाग तालुका :- संभाजी म्हात्रे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुरुड तालुक्यात मागील आठवड्यापासून पावसाने दमदार जोर धरला असून पावसाच्या धुव्वाधार बॅटिंग ने शहरातील सखल भागात पाणी साचले, मुरुड-अलिबाग रस्त्यावर राजवाडा जवळ नाले बंद झाल्याने रस्त्यावर पाणी येऊ लागले आहे. याचा दैनंदिन जीवनावर व वाहतूकीवर परिणाम दिसून येत होता.

भारतीय हवामान विभागाने पुढील 3 तासात मुंबईसह व रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय नियंत्रण कक्षाने कळविले आहे. पुढील 3-4 तासांत 45-55 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी येण्याची शक्यता-आयएमडी मुंबईने वर्तविण्यात आली आहे.
मुरुडमध्ये दि. 13 जुलै रोजी 108 मि.मि. पावसाची नोंद झाली असून तालुक्यात आतापर्यंत 1388 मि.मि. इतका पाऊस पडला आहे. फणसाड व आंबोली धरण भरून वाहू लागले आहेत.

तालुक्यातील साळाव, बोर्ली, मांडला, काशिद, नांदगाव मजगांव, मुरुड, आगरदांडा, राजपूरी भागात जोरदार पाऊस पडत आहे. विहूर नदीला भरपूर प्रमाणात पाणी आले, राजवाडा नजीकच्या रस्त्यावर असलेले धबधबे कोसळत होते तसेच शेगवाडा, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, बाजार पेठेतील कल्याणी स्टॉपवर पाणी साचल्याने सकाळच्या वेळेत येणारी काही वृत्तपत्रे पावसाने भिजली, रात्री पासूनच कोसळणाऱ्या धुव्वाधार पावसाने शहरासह तालुक्यातील जनजीवनावर परिणाम दिसून आला.

Previous article“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जालना जिल्हयात प्रभावीपणे राबवावी– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
Next article११५ लोकांना मेळघाटात गॅस्ट्रोची लागण, दूषित पाण्याने आजार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here