Home गडचिरोली विष प्रकरणातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना निलंबित...

विष प्रकरणातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना निलंबित करा

155
0

आशाताई बच्छाव

1000532222.jpg

विष प्रकरणातील दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना निलंबित करा

आमदार डॉ देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

रोपिनगट्टा  येथील ४ जुलैच्या नामकरण सोहळ्यातील जेवणातून झालेल्या विषबाधित प्रकरणाचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून उचलला मुद्दा

जीवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाही करण्याची केली मागणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

रोपिनगट्टा  येथील ४ जुलैच्या नामकरण सोहळ्यातील जेवणातून झालेल्या विषबाधित प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन पेंढरी येथे गेलेल्या विषबाधित व्यक्ती व नातेवाईकांची तक्रार दाखल करून न घेता उलट त्यांनाच मारहाण करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे पेंढरीचे पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना तात्काळ पदावरून निलंबित करावे अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातुन विधानसभेत केली.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत  रोपिनगट्टा  येथे ४ जुलै रोजी विनिया टेकाम यांचेकडील नामकरण सोहळ्यात बनविलेल्या जेवणात जाती दुश्मनी काढण्याच्या दृष्टीने अज्ञात व्यक्तीने  विष टाकून संपुर्ण परिवाराला ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यात ७० लोकांना विषबाधा झाल्याने त्यांना  पेंढरी येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील प्रकृती चिंताजनक झालेल्या २७ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे तर ८ रुग्णांना छतीसगड राज्यात भरती कऱण्यात आले. या प्रकरणातील विष टाकणारा संशयित व्यक्ती धनीराम दुग्गा या  व्यक्तीची तक्रार करण्यासाठी दिनांक ८ जुलै २०२४ ला पोलीस स्टेशन पेंढरी येथे विषबाधित व्यक्ती व नातेवाईक  गेले असता त्यांची तक्रार दाखल करून न घेता गोपीचंद लोखंडे पोलिस उपनिरीक्षक  पेंढरी यांनी  तक्रारकर्त्या ८ लोकांना बेदम मारहाण केली व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.  पेंढरी पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे हे दोषी व्यक्तींना पाठीशी घालत असून निर्दोष लोकांवर अत्याचार करीत आहेत. गावात जाऊन दमदाटी करून ग्रामस्थांना धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सदर प्रकरण अतिशय गंभीर असून दोषी व्यक्तींना पाठीशी घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद लोखंडे यांना तात्काळ पदावरून निलंबित करावे व  ज्यांनी अन्नातून विष टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यांची चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी आमदार डॉ देवराव जी होळी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातुन विधानसभेत केली.

Previous articleधम्माच्या प्रेरणेतून ‘पीपल्स’ एज्युकेशन ची स्थापना– आनंदराज आंबेडकर
Next articleमहाराणा प्रतापसिंह चौकाचे सौदर्यीकरण करुन पुतळा बसवा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here