Home पुणे हिट ॲण्ड रन’ घटनेने पुन्हा पुणे हादरले; दोन पोलिसांना भरधाव कारने उडवले;...

हिट ॲण्ड रन’ घटनेने पुन्हा पुणे हादरले; दोन पोलिसांना भरधाव कारने उडवले; एका पोलिसाचा मृत्यू, दुसरा गंभीर

24
0

आशाताई बच्छाव

1000531630.jpg

हिट ॲण्ड रन’ घटनेने पुन्हा पुणे हादरले; दोन पोलिसांना भरधाव कारने उडवले; एका पोलिसाचा मृत्यू, दुसरा गंभीर

पुणे ब्युरो चीफ:उमेश पाटील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात असलेल्या हॅरीस पुलाखालील अंडरपासजवळ एका भरधाव कारने रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास गस्तीवरील (मार्शल ड्युटी) पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली.पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात असलेल्या हॅरीस पुलाखालील अंडरपासजवळ एका भरधाव कारने रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास गस्तीवरील (मार्शल ड्युटी) पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार चालक पळून गेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. खडकी पोलीस स्टेशनचे खडकी बाजार मार्शल वरील कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलीस हवालदार समाधान कोळी यांना रात्री दीड वाजता अज्ञात कारने बोपोडी चौक येथे जोरदार धडक दिली. या घटनेत कोळी यांचा मृत्यू झाला असून संजू शिंदे हे गंभीर जखमी आहेत. त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रुबी हॉल रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
फरासखाना वाहतूक विभागात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाळून मारण्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे असा अपघात घडल्याने पोलिसच भीतीच्या छायेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here