Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी रविवार दि. 14 जुलै रोजी श्रीरामपूर बंदची...

श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी रविवार दि. 14 जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक

36
0

आशाताई बच्छाव

1000529738.jpg

श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी रविवार दि. 14 जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक.                       श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने करण्यात आले
त्यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक म्हणाल्या श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी स्व. गोविंद आदिककानी मूलभूत सुविधा उपलब्ध करून ठेवले आहे श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही प्रत्येक श्रीरामपूरकरांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने श्रीरामपूर जिल्ह्यासाठी जे जे आंदोलन होतील त्यामध्ये मी ताकदीं निशीउपस्थित राहील असेही त्या म्हणाल्या स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष म्हणाले की श्रीरामपूर जिल्हा करावा ही गेली 40 वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे परंतु राजकीय आकसापोटी श्रीरामपूर जिल्हा होण्यास अडथळा निर्माण केला जात आहे म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूरवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रविवार दि. 14 जुलै रोजी श्रीरामपूर स्वयंस्फूर्तीन कडकडीत बंद प्रत्येक श्रीरामपूरकरांनी बंदमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान त्रिभुवन यांनी केले उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले की श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सर्व गटतट विसरून श्रीरामपूरकर म्हणून एकजूट आपल्याला दाखवावी लागेल कामगार नेते नागेश सावंत म्हणाले की श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी आपल्याला उग्र स्वरूपाचे आंदोलन छडावे लागेल स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की सतेमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद वापरून श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सरकारला भाग पाडावे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक म्हणाले की श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आमदार लहू कानडेना सांगून विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करायला सांगेन शिवसेनेचे सचिन बडदे म्हणाले आपल्याला आंदोलनाबरोबर सरकारी दप्तरही कागदपतत्री भांडावे लागेल प्रशांत लोखंडे म्हणाले की श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांची वेळ घेऊन स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणेल श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे संजय कासलीवाल म्हणाले की आपण जर श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी एक जूट दाखवली नाही तर श्रीरामपूर भकास होण्यास वेळ लागणार नाही त्यावेळी आम आदमी पार्टीचे तिलक डूगरवाल म्हणाले की स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती लढा सातत्याने चालू आहे त्याला नक्की यश मिळेल त्यावेळी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन अध्यक्ष मुकेश कोठारी राहुल मुथा प्रवीण गुलाटी अशोक उपाध्ये उमेश पवार गौतम उपाध्ये संतोष बत्रा योगेश ओझा अभिजीत लिपटे बाळासाहेब चांडोळे शरद शेरकर निलेश बोरावके रियाज पठाण सतीश कुदळे डॉ. संजय नवथर अमोल साबणे नितीन कापसे अनिल तलोज एड. संदीप चोरगे आदित्य आदिक अविनाश पोहेकर अनिरुद्ध भिंगारवाला शुभम लोळगे आबासाहेब अवताडे प्रवीण फरगडे मच्छिंद्र साळुंखे वामन लचके सुरेश ठुबे दीपक कदम अनिल चांडवले हरेश भटेजा संदीप धिवर नितीन जाधव अल्ताफ शेख रमेश अमोलिक व सर्वपक्षीय नेते तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleअभिनेत्री अपूर्वा देशमुख हिने वृंदावन -मथुरा या ठिकाणी कुटुंबियांसोबत केला वाढदिवस साजरा.
Next articleरोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम च्या वतीने अपंग बांधवाना तीनचाकी सायकल वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here