Home जालना माहोरा गावासाठी १०० के.व्ही. चे १२ स्वतंत्र थ्री फेज रोहित्र मंजूर

माहोरा गावासाठी १०० के.व्ही. चे १२ स्वतंत्र थ्री फेज रोहित्र मंजूर

104
0

आशाताई बच्छाव

1000495739.jpg

माहोरा गावासाठी १०० के.व्ही. चे १२ स्वतंत्र थ्री फेज रोहित्र मंजूर
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक २६/०६/२०२४
सविस्तर वृत्त असे की, माहोरा गावासाठी माननीय मा. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे( दादा) तसेच कर्तव्यदक्ष आमदार श्री संतोष (भाऊ )दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने माहोरा येथे आर.डी.एस. एस.योजने अंतर्गत माहोरा गावासाठी १०० के. व्ही. चे १२ स्वतंत्र थ्री फेज रोहित्र मंजूर करण्यात आले. त्यासाठी माहोरा गावचे सरपंच श्री गजानन पाटील लहाने यांनी दादा आणि भाऊ यांना लाईट बाबतची माहिती देऊन व वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम त्याच्या माध्यमातुन मंजूर करण्यात यश आले. सरपंच साहेबांच्या या कामगिरी मुळे गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गावकऱ्यांमध्ये अंनादाचे वातावरण पहावयास मिळत आहे.त्या बारा पैकी जुन्या गावात एक रोहित बसविण्यात आले त्याचे उद्घाटन माहोरा नगरीचे प्रथम नागरिक सरपंच श्री गजानन भगवानराव लहाने त्यांच्या हस्ते नारळ फोडून रोहित चालू करण्यात आले. यावेळी माहोरा नगरीचे उपसरपंच श्री सय्यद हबीब भाई एम.एस. ई. बी. चे कर्मचारी श्री गजानन जाधव साहेब ,इंगळे साहेब , व गावातील उपस्थीत महेमूद भाई, लहाने, अनिस सैयद, जगन मुठ्ठे, राजू मुठ्ठे , गणेश सुरडकर, गणेश वाघ,काकडे, गणेश गायकवाड, बोर्डे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here