Home नाशिक नाशिकमध्ये वर्गात चक्कर आल्याने सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

नाशिकमध्ये वर्गात चक्कर आल्याने सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

507

आशाताई बच्छाव

1000495681.jpg

नाशिकमध्ये वर्गात चक्कर आल्याने सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी : कसमादे
नाशिक शहरातील सिडको परिसरातील एका शाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, प्राथमिक माहितीनुसार नाशिक मधील सिडको परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अकरा वर्षीय मुलीचा वर्गातच मृत्यू झाला आहे. दिव्या त्रिपाठी असे या मृत मुलीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं…?

ही मुलगी शाळेत चक्कर येऊन बेंचवरून खाली पडली असता, तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. केवळ चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीचा मृत्यू केवळ चक्कर आल्याने झालाय की, यामागे काही वेगळे कारण आहे याबाबत सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

Previous articleखर्डे येथे मुसळधार पावसामुळे निवाने बारी घाटात दरड कोसळली
Next articleराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.