Home मुंबई विधानसभेला भाजप शिंदे-पवारांना मागणीपेक्षा अर्ध्याही जागा द्यायला तयार नाही..?

विधानसभेला भाजप शिंदे-पवारांना मागणीपेक्षा अर्ध्याही जागा द्यायला तयार नाही..?

43
0

आशाताई बच्छाव

1000493462.jpg

विधानसभेला भाजप शिंदे-पवारांना मागणीपेक्षा अर्ध्याही जागा द्यायला तयार नाही..?
महायुतीत विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू..?

सतीश सावंत (कसमादे विभागीय प्रतिनिधी)

लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसत नाही की तोच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, येत्या तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये जागा वाटपाचीही चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. यातच आता महायुतीत जागा वाटपाची संभाव्य आकडेवारी समोर आली असून शिंदे गट 100, अजित पवार गट 90, जागांसाठी आग्रही असून अशातच रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले हे देखील 10 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.

तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे आणि विधानसभेला 250 जागांसाठी तयारी करायला सांगणारे राज ठाकरे यांनीही 20 जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर भाजपही 155 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व पक्षांकडून आपली इच्छा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आत्तापर्यंत भाजपकडून कुठलाही आकडा समोर आला नव्हता यानंतर पहिल्यांदाच भाजपची संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा?

सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने विधानसभा निवडणुकीत 155 जगांसाठी विधानसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली असून, शिंदे गटाची 100 जागांची मागणी असून, त्यापैकी 60 ते 65 जागा शिंदे गटाला आणि अजित पवार गटाची 90 जागांची मागणी असून त्यापैकी 50 ते 55 या दोन्ही पक्षांना देण्याची तयारी भाजपने दाखवली असल्याचे समजते. तर महायुतीतील अन्य तीन मित्र पक्षांसाठीही 15 जागा देण्यासाठी भाजप सकारात्मक असून, आता जागा वाटपाच्या चर्चेत रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय मागणी करतील आणि भाजप यासाठी तयार होईल का..? हे पहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातील जनतेने फार काही पसंती दर्शविली नाही. तर, केवळ 17 जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले. तर मविआन आघाडी घेत तब्बल 30 जागांवर विजय मिळवला. तर 23 जागा लढवून भाजपने केवळ 9 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपची या विधानसभा निवडणुकीसाठी कोणती नवी योजना असेल हे पाहावे लागणार आहे.

Previous article६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन
Next articleपंकज रहांगडाले पत्रकारिता सेवा पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here