Home नाशिक नाशिक मध्ये नवा ट्विस्ट शिक्षक मतदारांना भेटवस्तू आणि पैसे वाटप..?

नाशिक मध्ये नवा ट्विस्ट शिक्षक मतदारांना भेटवस्तू आणि पैसे वाटप..?

194
0

आशाताई बच्छाव

1000492990.jpg

नाशिक मध्ये नवा ट्विस्ट शिक्षक मतदारांना भेटवस्तू आणि पैसे वाटप..?

सतीश सावंत (कसमादे विभागीय प्रतिनिधी)
दिनांक 24 जून 2024

नाशिकच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून पैसे वाटप केल्याचे आरोप ठाकरे करून करण्यात आले आहेत. थेट मुख्यमंत्र्यांच्या एंट्रीने नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही आता हाय व्होल्टेज झाली असून, रोज नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या. यानंतर ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या निवडणुकीत शिंदे गटाकडून शिक्षक मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचे आरोप केले होते.

*शिक्षक मतदारांना भेटवस्तू वाटप*

यानंतर आता पुन्हा नाशिक शिक्षक मतदार संघातील शिक्षक महिला मतदारांना नथ आणि पुरुषांना कपडे देण्यात आल्याचे आरोप शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला असून याप्रकरणी निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात ही लढत रंगली आहे. 26 जूनला या जागेसाठी मतदान होणार असून मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

मागील निवडणुकीत पैठणी मुळे वाद

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या मागील निवडणुकीतही महिला शिक्षक मतदारांना पैठणी वाटण्यात आली होती. तर, यामुळे वादी झाला होता. काही ध्येयवादी शिक्षकांनी या वाटण्यात आलेल्या पैठण्या जाळून या प्रकारचा निषेधही केला होता. त्यावेळीही या प्रकारची हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र, याही निवडणुकीत पुन्हा तेच घडत असून, काही उमेदवार पुन्हा शिक्षकांना वस्तू वाटप करत असल्याच्या चर्चा आहेत.

यावेळी पुरुष शिक्षक मतदारांना रेमंड कंपनीचे सफारीचे कापड व महिला शिक्षक मतदारांना नथ दिली जात असून या वस्तूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यात तर थेट शाळेत जाऊन या भेटवस्तूंची वाटप करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची आणि कारवाई करण्याची मागणी शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली आहे.

Previous articleहॉटेल ड्रग्ज प्रकरण,
Next article६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here