Home वाशिम वटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण, संवर्धन व संगोपनाचा संकल्प करा – प्रा. संगीता इंगोले

वटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण, संवर्धन व संगोपनाचा संकल्प करा – प्रा. संगीता इंगोले

48
0

आशाताई बच्छाव

1000485459.jpg

वटपोर्णिमेनिमित्त वृक्षारोपण, संवर्धन व संगोपनाचा संकल्प करा – प्रा. संगीता इंगोले
वाशिम,( गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- वटपोर्णिमेनिमित्त सुवासिनींनी वडाची पुजा करण्यासोबतच मोफत प्राणवायु देवून मनुष्याचे जिवन सुकर करणार्‍या निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करुन या संपूर्ण जीवसृष्टीचा गुदमरलेला जीव वाचविण्यासाठी व्रतस्थपणे संकल्प घ्यावा असे आवाहन सामाजीक कार्यकर्त्या तथा सहयोग फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रा. संगीता वसंत इंगोले यांनी केले आहे.
वटपोर्णिमेनिमित्त सहयोग फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन सामाीक संदेश दिला जातो. एका वर्षातील १२ पोर्णिमेपैकी जेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पोर्णिमा ही वटपोर्णिमा म्हणून सुवासिनी उत्साहात साजरी करतात. हा सण वटसावित्री म्हणूनही ओळखला जातो. यादिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पुजा केली जाते. यादिवशी स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाची पुजा करतात आणि उपवास करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्ण आणि महेश यांचा वास असल्याचे मानले जाते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगीतले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्व अधिक आहे. यासोबतच वडाचे झाडे हे १०० वर्षापेक्षा अधिक वर्षे जगते. जगाला विनामुल्य प्राणवायू देणार्‍या या वृक्षांचे अस्त्वि टिकावे, त्यांची संख्या वाढावी जेणेकरुन पृथ्वीला मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळावा यासाठी वटसावित्रीच्या पवित्र दिवशी सुवासिनींनी वडाच्या वृक्षासोबतच इतरही बहुउपयोगी वृक्षाचे वृक्षारोपण तसेच वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन प्रा. संगीता इंगोले यांनी केले आहे.

Previous articleचक्‍क दुचाकीस्वारांनी दिवसाढवळ्या दोन लाखांची बॅग पळवली मलकापूर-बुलढाणा मार्गावरील घटना…
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय कार्यालयात ५०१ वृक्षांचे वितरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here