Home भंडारा योग दिनात ५०० नागरिकांनी केली योग प्रात्यक्षिके जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

योग दिनात ५०० नागरिकांनी केली योग प्रात्यक्षिके जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

88
0

आशाताई बच्छाव

1000485379.jpg

योग दिनात ५०० नागरिकांनी केली योग प्रात्यक्षिके

जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी,) दि. २१: दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये साधारणत: पाचशेच्यावर नागरिकांनी सहभाग घेऊन योगासनांची सामूहिक प्रात्यक्षिके केली.
योग दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी लीना फलके, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, डॉ. रमेश खोब्रागडे, नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर, डॉ. भगवान मस्के, जे. एम. पटेल महाविद्यालयातील हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, वैशाली गिऱ्हपुंजे, डॉ. भीमराव पवार, प्राध्यापक रोमी बीस्ट,योगा शिक्षक विलास केजरकर, डॉ. जितेंद्र किरसान प्रामुख्याने उपस्थित होते .
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे वृक्षरोपे देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्कूल ऑफ स्कॉर्सची विद्यार्थीनी कामाक्षी मदनकर हिने योग नृत्य सादर केला.त्यानंतर डॉ. रमेश खोब्रागडे, वैशाली गिऱ्हपुंजे, भोजराज झंझाळ यांनी योग्य प्रात्यक्षिके करून दाखविले. योगमय वातावरणात ५०० हून अधिक नागरिकांनी सक्रिय योगासने करून सहभाग नोंदवला.
यामध्ये ग्रीना संचालन, स्कंद संचालन स्कंदचक्र, कंधी चालन, घुटना संचालन, तारा संरक्षण, पादस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, अनुलोम, विलोम, कपाल भाती, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम इत्यादी योग प्राणायामचा अभ्यास करण्यात आला.
यावेळी योग शिक्षकांचे यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यावरण पंधरवडा निमित्त महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भोजराज श्रीरामे व प्रास्ताविक डॉ. रमेश खोब्रागडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जे. एम. पटेल महाविद्यालयातील हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, जे. एम. पटेल महाविद्यालय, पतंजली योग समिती, सांस्कृतिक चिकित्सालय लायन्स क्लब, जिल्हा योग संघटना, संत गुलाब बाबा युवा प्रशिक्षण केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, जे. एम. पटेल महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग, एन.सी.सी विभाग, एन. एस.एस. विभाग, व माजी विद्यार्थी संघटना, प्राध्यापक व योगसाधक- साधिकांनी सहकार्य केले.

Previous articleजिजाऊ ज्ञानमंदिरात योग दिन साजरा.
Next articleसुरगाव येथील कत्तलखान्याकरिता एक हेक्टर जागा रस्त्यालगतची हस्तांतरित करू नका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here