Home जालना विप्र फाउंडेशन शाखा जालना अध्यक्षपदी रामनिवास गौड व सचिवपदी पवन जोशी यांची...

विप्र फाउंडेशन शाखा जालना अध्यक्षपदी रामनिवास गौड व सचिवपदी पवन जोशी यांची फेरनिवड तर कोषाध्यक्षपदी नारायण दायमा यांची निवड

36
0

आशाताई बच्छाव

1000484759.jpg

विप्र फाउंडेशन शाखा जालना अध्यक्षपदी रामनिवास गौड व सचिवपदी पवन जोशी यांची फेरनिवड तर कोषाध्यक्षपदी नारायण दायमा यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 21/06/2024
फाउंडेशन शाखा जालना यांच्या वतीने नुकतेच शहरातील रुपम हॉल या ठिकाणी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता सदरील कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए आर. बी. शर्मा , झोन 12 सी चे अध्यक्ष राजेश बुटोले ,महामंत्री सुरेश पारीक , कोषाध्यक्ष किशोर उपाध्याय यांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रमात विप्र फाउंडेशन जालना शाखेच्या अध्यक्षपदी रामनिवास गौड व सचिवपदी पवन जोशी यांची फेरनिवड करण्यात आली तर कोषाध्यक्ष म्हणून नारायण दायमा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्षपदी मनोज दायमा, जयप्रकाश श्रीमाली , कैलास खंडेलवाल , उमेश पंचारिया , ललित बीजावत ,रामेश्वर जोशी यांची तर सहसचिव पदी दिलीप व्यास , सहकोषाध्यक्षपदी संजय सारस्वत , संस्कारोदयपदी आचार्य सत्यनारायण व्यास ,परमपूज्य मनोज महाराज गौड, भक्तमाल कथा प्रवक्ता किशोर तिवारी, संघटन मंत्रीपदी रवींद्र अबोटी, दिलीप गौड, शिक्षा मंत्रीपदी भगवान दायमा ,स्वास्थ मंत्रीपदी डॉ. नितीन खंडेलवाल , डॉ.गोविंद सारस्वत ,खेल मंत्रीपदी रामकुमार श्रीमाली ,दुर्गेश दायमा ,प्रसिद्ध मंत्रीपदी महेश खंडेलवाल ,जितेंद्र ओझा ,जनसंपर्क मंत्रीपदी चंद्रप्रकाश श्रीमाली ,सुरेश शर्मा तर कार्यकारणी सदस्य म्हणून मुरारीलाल सारस्वत , जुगलकिशोर श्रोत्रीय ,सुरेश उपाध्याय , बंकटलाल खंडेलवाल , ओमप्रकाश दायमा ,अशोक शर्मा , किशोर शर्मा ,सतीश शर्मा , डुंगरसिंह राजपुरोहित यांची निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए आर बी शर्मा यांनी जालना विप्र फाउंडेशन शाखेचे कार्य कौतुकास्पद असून यापुढेही शाखेने जोमाने कार्य करून सामाजिक संघटन वाढवावे असे आवाहन यावेळी केले तर झोन 12 सी चे अध्यक्ष राजेश बुटोले यांनी विप्र फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत असलेल्या विविध योजनेची व कार्याची माहिती उपस्थितांना दिली तर महामंत्री सुरेश पारीक यांनी विप्र समाजातील बांधवांनी एकत्रित येऊन समाज हितासाठी कार्य करावे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी विप्र फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे यावेळी ते म्हणाले तर यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी रामनिवास गौड यांनी नवनियुक्त कार्यकारणीत विप्र समाजातील सर्व घटक सामावून घेण्यात आले असून येणाऱ्या काळात समाजाच्या विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करू असे यावेळी सांगितले तर सचिव पवन जोशी यांनी जालना विप्र समाज सदैव सामाजिक, धार्मिक कार्यात हिरीरीने सहभागी होऊन सामाजिक एकतेचे प्रदर्शन करीत आलेला आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो असे यावेळी सांगितले यावेळी  विप्र समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleसोनुने कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम वटपौर्णिमेच्या निमित्ताने सरस्वती विद्यालयात पुस्तकांच वाटप.
Next articleनामपूरला तब्बल 47 वर्षांनी भरली शाळा……
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here