Home उतर महाराष्ट्र शनिचौथऱ्याचा पाया तयार दगडाची घडण पूर्ण; भाविकात उत्सुकता 

शनिचौथऱ्याचा पाया तयार दगडाची घडण पूर्ण; भाविकात उत्सुकता 

114
0

आशाताई बच्छाव

1000484637.jpg

शनिचौथऱ्याचा पाया तयार

दगडाची घडण पूर्ण; भाविकात उत्सुकता

सोनई,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)शनिभक्त व्यंकटेश राव यांच्या खर्चातून व शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शनिचौथरा नूतनीकरण कामाच्या वाढीव पायाचे काम पूर्ण झाले आहे. ६१ लाख रुपये खर्चाच्या घडीव दगडातील कामाची उत्सुकता भाविक
व ग्रामस्थांना लागली आहे. एक महिना काम सुरू असताना चौथऱ्यावरील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

शनिशिंगणापूर येथे अंदाजे साडेचारशे वर्षापूर्वी स्वयंभू शनिमूतींची स्थापना करण्यात आल्यानंतर आहे त्या चौथ-यास दोन वेळेस फरशी व इतर काम करण्यात आलेले आहे. येथील देवता चौथ-यावर विराजमान
असल्याने येथे कुठलेही मंदिर नाही, यामुळे येथील चौथरा आकर्षक असावा, अशी संकल्पना वेंकीज ग्रुपचे कार्यकारी संचालक व्यंकटेश राव यांनी विश्वस्त मंडळास सांगितल्यानंतर गोवा राज्यातील स्थापत्य अभियंता अभिजित साचले

पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुस-या टप्प्यातील काम एक महिना चालणार असल्याने या काळात पायावरील दर्शन बंद ठेऊन
सर्वांसाठी पादुका व मूर्तींचे दर्शन समोरुन करता येणार आहे. -जी. के. दरदले, कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट

देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेला पानसतीर्थ घाट प्रकल्प,
नवग्रह मंदिर, मुयारी दर्शनपथ व दगडी दीपस्तंभ विशेष आकर्षण ठरत आहे.
असा आहे चौथरा
घडीव दगड १६
दगडी कॉर्नर ४
रेड आग्रा फरशी २०
सिंह याली ४
ब्रास कास्टिंग ६२ फूट
गोमूख १
एकूण पायऱ्या १०

यांनी दिलेल्या डिझाईननुसार प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात आली आहे.

पूर्वीपासून १८ कय १८ आकारात असलेला चौथरा आता २१ बाय २१ आकारात सजला जाणार आहे. १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हुबळी (कर्नाटक) येथून पडीव दगड शनिशिंगणापूर येथे दाखल झाले असून तेथील कारागिरांनी नाजूक कोरीव काम येथे पूर्ण केले आहे. शनिदर्शन सुरु ठेवून पावणेदोन फूट रुंद व सहा फूट खोलीचा पाया व काँक्रिटचे काम झाले आहे. सध्या चौथ-यावरील दर्शन पूर्व बाजूने सुरु आहे. जुन्या पाकशाळेसमोर ठेवण्यात आलेले आकर्षक घडीव दगड पाहता नवीन चौथ-याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Previous articleदेगलूर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..!
Next articleसोनुने कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम वटपौर्णिमेच्या निमित्ताने सरस्वती विद्यालयात पुस्तकांच वाटप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here