Home मुंबई विधानसभेपूर्वी राज्य सरकार राबवणार महिलांसाठी ‘ही’ भन्नाट योजना..?

विधानसभेपूर्वी राज्य सरकार राबवणार महिलांसाठी ‘ही’ भन्नाट योजना..?

92
0

आशाताई बच्छाव

1000484598.jpg

विधानसभेपूर्वी राज्य सरकार राबवणार महिलांसाठी ‘ही’ भन्नाट योजना..?                                         मुंबई,(प्रतिनिधी सतिश सावंत)

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली असून, आता येत्या ३ ते ४ महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचेही बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार अनेकविध योजना राबवत असून, यातच आता राज्यातील गरीब महिलांना मदत म्हणून सरकार ‘लाडली बहना योजना’ (Ladli Bahna Yojana) सुरू करणार आहे.

हो योजना मध्य प्रदेश सरकार चालवत असून, याच धर्तीवर ती महाराष्ट्र सरकारकडून देखील गोरगरीब महिलांना आधार म्हणून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येईल, अशा उद्देशाने ही योजना महिलांसाठी तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाची मतं वळवण्यासाठी ही योजना सुरू केली जाऊ शकते.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंडिया आघाडीचे सरकार आल्यास गोरगरिब महिलांना वर्षाला एक लाख रुपये इतकी रक्कम देणार असे आश्वासन दिले होते. काही राज्यात याचा काँग्रेस आणि मित्रपक्षांना फायदाही झाला. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अशी एखादी योजना सुरू करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटी महिलांना लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेश सरकार हे लाडली बहना या योजनेद्वारे गरीब महिलांच्या खात्यावर १,२५० रुपये जमा करत असते. तर, महाराष्ट्र सरकारने यापेक्षा जास्त रक्कम देण्याचीही तयारी केली असल्याची माहिती आहे.

काय आहे योजना?

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये ‘लाडली बहना योजना’ सुरू केली होती. या योजने अंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात १,२५० रुपये जमा होतात.
तर, मध्य प्रदेशमध्ये १ कोटी २९ लाख लाभार्थी महिला या लाडली बहना योजनेचा लाभ घेत आहेत. गेल्या ११ महिन्यांपासून ही योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. विवाहिता, घटस्फोटीत, आर्थिक दुर्बल अशा विविध महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
लाभार्थी महिलांसाठी वयाची अट ही २१ ते ६० वर्ष इतकी आहे.
तर कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
दरम्यान, विधानसभेला फायदा व्हावा. या उद्देशाने महाराष्ट्र सरकारही अशीच एक योजना सुरु करण्याच्या तयारीत असून, त्यात अशाच काहीशा अटी व पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Previous articleसटाणा येथील मातोश्री शाळेत योग दिन उत्साहात साजरा
Next article21जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निःशुल्क योग शिबिर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here