Home उतर महाराष्ट्र डी पॉल शाळेत मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा….

डी पॉल शाळेत मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा….

49
0

आशाताई बच्छाव

1000484574.jpg

डी पॉल शाळेत मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा….                                                        श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)

डी पॉल शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेचे मॅनेजर फादर शिजो, व्यवस्थापक फादर फ्रांको , प्रिन्सिपल ,सिस्टर सेलिन,सिस्टर दीप्ती,समन्वयक रविंद्र लोंढे सर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचा प्रांगणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सर्वात झाली.सिस्टर दीप्ती यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर
डी पॉल इंग्लिश मिडीयम व डी पॉल पब्लिक स्कूल या दोन्ही शाळेच्या विद्यार्थीनी उत्स्फूर्तपणे विविध योगासने व प्राणायाम याचे प्रात्यक्षिक केले.सौ सोनम वधवा यांनी योगासनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले.सौ रेणुका राऊत यांनी योगदिना विषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ हेमा कोहली व सौ ज्योती जाधव, यांनी केले.सौ
निशिगंधा फोपसे यांनी आभाप्रदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक संदीप निबे व संदीप जाधव तसेच आशिष अमोलिक , नारायण झांबरे,सुनील बोरागे,दीपक कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याचे
सहकार्य लाभले.

Previous articleआयशा उर्दू हायस्कुल मधे मुलींना मोफत सायकल वाटप
Next articleपिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला खिंडार प्रियंका बारसेंचा शरद पवार गटात प्रवेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here