Home उतर महाराष्ट्र नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर साडेपाच तासांपेक्षा जास्त वाहतूक कोंडी

नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर साडेपाच तासांपेक्षा जास्त वाहतूक कोंडी

106
0

आशाताई बच्छाव

1000465021.jpg

नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर साडेपाच तासांपेक्षा जास्त वाहतूक कोंडी

प्रतिनिधी | सोनई कारभारी गव्हाणे 

रुग्णवाहिकाही अडकल्या, वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांची दमछाक मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते.

नगर ते छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील घोडेगाव येथे शुक्रवारी आठवडे बाजाराच्या दिवशी सुमारे साडेपाच तास वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या सुमारे सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

यामध्ये तीन रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या. यामुळे वाहनचालक व ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव (ता. नेवासा) हे गाव गायी, म्हशीच्या आठवडे बाजारासाठी राज्यासह, देशभरात प्रसिद्ध असलेले गाव आहे. शुक्रवारच्या बाजारात जनावरांची

देशातून मोठ्या संख्येने व्यापारी, जनावर विक्रेते, ग्राहक, शेतकरी, यांची वर्दळ असते. पण गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक बाजारच्या दिवशी होणारी व वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. शुक्रवारी सोनई, शनिशिंगणापूर पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, बेशिस्त वाहनचालकांनी चुकीच्या दिशेने वाहने पुढे नेल्याने

वाहतूक कोंडीत भर पडली. पोलिस प्रशासनाने यावर मार्ग काढून वाहतूक

विकासकामे प्रलंबित आहेत : सभापती पाटील

नेवासे कृषी उत्पन्न बाजार समिती
घोडेगाव उपबाजारात सोयी सुविधा मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. परंतु या प्रस्तावाला जाणीवपूर्वक शासनपातळीवर डावलले जाते. यामुळे विकासकामे प्रलंबित असून पुढील काळात कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू

आहेत, असे नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी सांगितले.

सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here