आशाताई बच्छाव
दैनिक युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे आज भारतामध्ये अनेक दिवस वेगवेगळ्या जोशामध्ये साजरे केले जातात यामध्ये रोज डे साडी डे चॉकलेट डे व्हॅलेंटाईन डे फादर डे असे अनेक डे साजरे केले जातात परंतु या सर्वांमधील माझ्या मते जो महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे मदर डे आई, आई या शब्दाचे महत्त्व खूप मोठे आहे आ म्हणजे आई आणि इ म्हणजे ईश्वर, ईश्वर प्रत्येक ठिकाणी स्वतःची पूर्तता करू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती प्रत्येक घरी केलेली आहे आई हा शब्द ज्याच्या आयुष्यामध्ये आहे म्हणजे साक्षात आई ज्या घरी आहे त्याच व्यक्तीला आईचं महत्व समजू शकते आईची जागा जगामध्ये कोणताही व्यक्ती घेऊ शकत नाही माणूस आयुष्यामध्ये सर्व काही कमावू शकतो पण एकच गोष्ट आयुष्यामध्ये कोणताच व्यक्ती कमावू शकतनाही आणि ते म्हणजे आई माझा जन्म ज्या मातेच्या पोटी झाला त्या आईला माझा कोटी कोटी प्रणाम जिच्या कष्टामुळे तिने लावलेल्या चांगल्या संस्कारामुळे आज मी जो कोणी आहे तो फक्त तिच्या मेहनतीमुळे आज ती माझ्या आयुष्यात आहे म्हणून माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे तिचा आशीर्वाद प्रत्येक पावलोपावली माझ्यासोबत असतो आणि याचमुळे मला प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळत चाललेले आहे माझ्या आईचं नाव लता तिच्याबद्दल बोलेल इतकी तर माझी पात्रता नक्कीच नाही परंतु आजचा दिवस आहे की जे मातृत्वाबद्दल आपण स्वतः दोन शब्द बोलू शकतो माझ्या आईने स्वतःच घर चालवतत असताना आम्हा मुलांना संभाळत असताना खूप गोष्टींचा तिला त्याग करावा लागला आणि तो त्याग करून वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून तिने सर्व गोष्टी मुलांना कशा मिळतील यावर आतापर्यंत काम केलं त्यांच्या दोघांच्या अथक परिश्रमामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं मजुरी शेत काम करून त्यांनी कोणतीच गोष्ट आम्हाला कमी पडू दिली नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पैशापेक्षा जास्त मुलांना संस्कारावरती घडवलं आणि त्याचेच फळ असे की आम्ही तिन्ही भावंडे आज समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे जीवन जगत आहे आई-वडिलांचे उपकार या जन्मी तरी आम्ही फेडू शकणार नाही त्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊनच आज समाजामध्ये मी जगत आहे मुलांचा सांभाळ करत असताना एक वेळेस स्वतःच्या पोटाकड त्यांनी कधीचच पाहिलं नाही परंतु मुलांना कोणतीही गोष्ट कमी पडू दिलेली नाही अशा मातेच्या पोटी माझा जन्म झाला आणि आत्ता त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाले आणि त्यांच्या दोघांचाही आशीर्वादामुळे जीवनामध्ये खूप चांगले बदल घडत चाललेले आहेत माझ्या हातून त्यांची सेवा घडतच आहे पण त्याचबरोबर समाजामध्ये रंजल्या गांजल्यांना गोरगरिबांना जास्तीत जास्त मदत आपल्याकडून कशी होईल यावर जीवनामध्ये काम कर असे माझ्या आईचे पावलोपावले सांगणे असते आयुष्यात येणाऱ्या संकटांवरती न घाबरता त्यावरती मात करून पुढे कसेे जायचे हे मला माझ्या आईने चांगले शिकवले आणि तिचाच आदर्श घेऊन आयुष्यात आलेल्या अनेक संकटांच्या छातीवर पाय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या आईबद्दल बोलण्यासारखं बरच काहीी आहे पण जाता जाता एकच सांगेल, “आईची ही वेडी माया, पडतो मी तुझ्या पाया, तुझ्या पोटी जन्मो, हीच माझी जन्मोजन्मीची आशा” पुनच्छ एकदा माझ्या आईला कोटी कोटी प्रणाम