Home बीड एमबीबीएसचे शिक्षण मराठी भाषेतुन; पॉलिटेक्निक व इंजिनियरींगचे पेपर मराठी भाषेत देता येणार

एमबीबीएसचे शिक्षण मराठी भाषेतुन; पॉलिटेक्निक व इंजिनियरींगचे पेपर मराठी भाषेत देता येणार

43
0

आशाताई बच्छाव

IMG_20240304_062459.jpg

एमबीबीएसचे शिक्षण मराठी भाषेतुन; पॉलिटेक्निक व इंजिनियरींगचे पेपर मराठी भाषेत देता येणार

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:०३  नुकतेच काही दिवसापूर्वी शासनाने एमबीबीएस चे शिक्षण मराठीतुन देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे जाहीर केलेले आहे. अशारदाता पॉलिटेक्निकल आणि इंजिनिअरिंग या परीक्षांचे पेपर सुद्धा मराठी भाषेतून देता येणार असल्याचे विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले आहे. पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बरोबरच मराठीतही परीक्षेचे पेपर लिहिता यावेत. यासाठी विधानसभेने मंजूर केलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक गुरुवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत मांडले होते. विधेयकाचा हेतू स्पष्ट करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की सन २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण घोषित केले आहे. या धोरणानुसार मात्रृभाषेला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक व इंजिनियरिंग या दोन्ही वर्गाची सर्व पुस्तके मराठीतून केली पण लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कायद्यामध्ये इंग्रजी आहे. त्याऐवजी विधेयकात इंग्रजी व मराठी असा बदल केला आहे. यामुळे प्रश्नपत्रिका दोन भाषेत येतील व उत्तरं सुद्धा दोन भाषेत लिहिण्यास परवानगी असेल तसेच परीक्षेच्या सहा प्रश्नपत्रिका चार मराठीत व दोन इंग्रजीमध्ये लिहिली तरी चालणार आहे. पण हे ऐच्छिक असणार असून त्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी चार वर्षाची केली जाणार असून ती पूर्ण करण्यासाठीचा कालावधी ऐच्छिक असणार आहे. असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या विधेयकाचे स्वागत करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले मराठी भाषेचा जास्तीत जास्त ठिकाणी वापर केला पाहिजे. मराठीचा वापर डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता इतर विद्यापीठातही त्याचा उपयोग झाला पाहिजे. इतर विद्यापीठातही विविध विषयांच्या परीक्षा होत असतात. तामिळनाडू केरळ या राज्यात केंद्राच्या कार्यालयात त्यांची भाषा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आपल्याकडेही केंद्र शासनाच्या कार्यालयातील अशा भाषा वापरण्यासाठी सरकारने आग्रह धरला पाहिजे असे अंबादास दानवे म्हणाले. हे पाहता आता आपल्या महाराष्ट्रात माय मराठीला चांगले दिवस येण्याची शक्यता बळावली आहे.

Previous articleताहराबाद वनविभागाच्या हद्दीतील प्रकार;जंगलाला लागली आग, वनविभागाला कधी येणार जाग…?
Next articleआधी जागा वाटपावर निर्णय घ्या, नाहीतर आम्ही स्वातंत्र्य: बच्चू कडू यांचा महायुतीला इशारा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here