आशाताई बच्छाव
विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी परिसर मुलाखतीची आवश्यकता –
गिरीश देशपांडे.
देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)
देगलूर: महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याच्या करिअर साठी परिसर मुलाखतीची गरज असते, असे गोदावरी ड्रग्ज कंपनीचे प्रशासकीय अधिकारी गिरीश देशपांडे यानी मांडले
ते येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयात प्लेसमेंट सेल , रसायनशास्त्र विभाग आणि गोदावरी ड्रग्स लिमिटेड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ होते.
मुलाखतीच्या अनुषंगाने सुरुवातीला गोदावरी ड्रग्सचे प्रशासकीय अधिकारी गिरीश देशपांडे यानी कंपनी विषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी मुलाखतीचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी
उपप्राचार्य डॉ.अनिल चिद्रावार, डॉ.रत्नाकर लक्षट्टे , डॉ. विनय भोगले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद काळे तर आभार प्रा.गणेश क्यादारे यांनी मानले. डॉ. राजकुमार पोकलवार, प्रा असफिया नाज, अनुसया पाटील तसेच पांडुरंग जाधव, विशंभर कंतेवार यांचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.