आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे आमदाराच्या कार्यालयावर धरणग्रस्त आंदोलकांची धडक. आंदोलन व पोलीस यांच्यामध्ये झाली धक्काबुक्की.–
————-
दैनिक युवा मराठा
दी.२३
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी गेल्या दहा महिन्यापासून अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे समोर उपोषण सुरू असून, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदन, चक्काजाम, जलसमाधी आंदोलन केली. परंतु धरणग्रस्त शेतकऱ्यांची लोकप्रतिनिधी सह शासन दरबारी ही दखल घेण्यात आली नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बैठकीचे आश्वासन देऊन बैठकी घेतली नाही, त्यामुळे संतप्त आंदोलकांनी गुरुवार दिनांक 22 रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे आ. देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यात एक उर्दू शंकराला दुखापत झाल्याने
प्रकरण चिघळले. ही घटना दुपारी २ वाजता घडली आहे. अप्पर वर्धा प्रकल्पात पन्नास वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने त्यांना धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी द्यावी, वाढीव मोबदला मिळावा यासाठी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दहा महिन्यापासून अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे मूर्ती तहसीलदार उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळावा म्हणून उपोषणकर्त्यांनी चक्काजाम मंत्रालयावर उड्या घेण्यापर्यंत आंदोलन केले तर गेल्या महिन्यात गोपाल बाजीराव दहीवाडे या आंदोलन शेतकऱ्याने उपोषण मंडपातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सरकार आपल्या मागण्या मान्य करत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी लोकप्रतींना जाब विचारण्यासाठी गुरुवारी तहसीलदारांना निवेदन देऊन आ. देवेंद्र भुयार यांच्या शेतकरी भवन कार्यालयावर गेले. मात्र तेथे त्यांची भेट न होऊ शकल्याने असंतुषांचा बांधा फुटलेल्या संतप्त आंदोलन शेतकऱ्यांनी कार्यालयावर हल्लाबोल केला.






