Home जळगाव चाळीसगाव पोलिसांची कामगिरी 18 लाखाच्या अफूच्या बोंडा सह कार हस्तगत – आरोपी...

चाळीसगाव पोलिसांची कामगिरी 18 लाखाच्या अफूच्या बोंडा सह कार हस्तगत – आरोपी मात्र फरार कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल.

213

आशाताई बच्छाव

IMG-20231008-WA0086.jpg

चाळीसगाव पोलिसांची कामगिरी 18 लाखाच्या अफूच्या बोंडा सह कार हस्तगत – आरोपी मात्र फरार कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल.

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चा पाठलाग करून चाळीसगाव शहर पोलिसांनी दि 8 रोजी सकाळी 5-45 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का जवळ 1 क्विंटल, 80 किलो, 240 ग्रँम वजनाच्या 18 लाख 2400 रुपये किमतीच्या एकुण 9 गोण्या त्यामध्ये अफुची बोंडे व बोंडाचा चुरा (अमली पदार्थ) तसेच 10 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची, हुंडाई कंपनीची, क्रेटा कार क्रमांक MP 09 WC 1485 असा एकुण 28,02,400/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन ताब्यात घेतला असून कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दि 8 रोजी उपनिरीक्षक सुहास आव्हाड गस्त करीत असतांना त्यांना चाळीसगांव शहरातील कोतकर कॉलेज जवळ सकाळी 05.45 वाजता एक पांढऱ्या रंगाची, हुंडाई कार क्रमांक MP 09 WC 1485 हिच्यावर संशय बळावल्याने कार चालकास थांबण्याचा इशारा दिला असता त्याने इशाऱ्यास न जुमानता भरदाव वेगाने कार नेली .गस्तीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य रस्त्यावर येऊन कार अडवण्याचा प्रयत्न केला..सदर वाहन चालक यास पळून जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने तो सदरचे वाहन रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का जवळ वाहन सोडून पळून गेला कारची पाहणी केली असता त्यात 1 क्विंटल, 80 किलो, 240 ग्रँम वजनाच्या 18 लाख 2,400 रुपये किमतीच्या एकुण 9 गोण्या त्यामध्ये अफुची बोंडे व बोंडाचा चुरा (अमली पदार्थ) तसेच 10 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची, हुंडाई कंपनीची, क्रेटा कार क्रमांक MP 09 WC 1485 असा एकुण 28 लाख 2,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला असून कार चालकावर चाळीसगांव शहर पोलिसात 478/2023 एन.डी.पी.एस. ॲक्ट 1885 चे कलम 18(ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि सागर ढिकले, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, हवालदार नितीन वाल्हे, राहुल सोनवणे, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, पोलीस नाईक महेंद्र पाटील, भुषण पाटील, तुकाराम चव्हाण, दिपक पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, विजय पाटील, पवन पाटील, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, रविंद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर गिते, विनोद खैरनार, निलेश पाटील, शरद पाटील, प्रविण जाधव, संदीप पाटील यांनी केली आहे.

Previous articleआताची मोठ्ठी बातमी!अखेर निवडणूक जाहिर ७ नोव्हेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी…!
Next articleझेंडेपार लोह खाणींची जनसुनावणी अन्यायकारक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.