आशाताई बच्छाव
…..ब्रेकिंग न्यूज नेवासा बेलपिंपलगावं…
लाथा बुक्क्यांनी, बेल्ट चोपर सह धाडस संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष गणेश चौगुले यांना मारहाण करून जिवे मदरण्याची धमकी सरपंच कृष्णा शिंदे ,किरण साठे यांनी केली मारहाण
नेवासा,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी) :- नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश चौगुले यांनी ग्रामपंचायत माहिती अधिकार माहिती मागीतली , गावातील गावठाण मधून सरपंच आणि गुंड प्रवृत्ती असणारा किरण साठे आणि त्यांचे साथिददार संगनमत करून अनधिकृत मुरूम, करखडी बेकायदा वाहतूक करून गावातील सार्वजनिक मालमत्ता लूट करत असल्याचे गणेश चौगुले यांनी निदर्शनास आणून दिले. गणेश चौगुले हे तलाठी कार्यालय यांनी लेखी तक्रार व अर्ज तलाठी कार्यालयात दिला व पंचनामा करण्यास सांगितले होते आज दिनांक 06/10/2023 शुक्रवार रोजी सकाळी 11.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय समोर गणेश चौगुले अर्धनग्न आंदोलन करणार होते.
याची सर्व कल्पना विद्यमान सरपंच कृष्ण शिंदे यांना होती. त्याचा राग मनात धरून तसेच गावातील विविध शासकीय अधिकारी गावात किंवा पंधरा किलोमीटर अंतर बाहेर कोण कोण राहते याची मागणी गणेश चौगुले यांनी केली म्हणून ग्रामपंचायत समोर शिवी गाळ करत सरपंच कृष्णा शिंदे आणि किरण साठे यांनी ती जातीवाचक बोलतो , तुझा व्हिडिओ आमच्याकडे आहे. गावात तू आमचे काही वाकडे करू शकत नाही. तुला जिवे मारून टाकले तरी माझे कोण्ही काही करू शकत नाही. तुझ्यावर atrocity गुन्हा दाखल करू. ग्रामसेवक, तलाठी शिक्षक पशुवैद्यकीय अधिकारी पाटबंधारे अधिकारी यांना तू नियम शिकवतो तुझे तुकडे तुकडे करून टाकू. तू गावात शांत गुमान रहा अन्यथा तुला गावातून बेदखल करू. तुझा गावातून काढून द्यायचा ठराव घेऊ. आमच्या नादाला लागू नको आम्ही काही करू गावात. माझ्या नादाला लागू नको अन्यथा तुझ्या आईसह तुला जिवे ठार मारू. तू आमचे काही वाकडे करू शकत नाही. तू हे कुन्हालही सांग आमचे कोण्ही काही वाकडे करू शकत नाही. तू एकटाच आम्हाला नियम शिकवतो. आम्ही पैसे खर्च करून निवडून आलोत गावात मुरूम, कार खडी, माती काही करू तू शांत बस नाहीतर खोट्या गुन्ह्यात तुला अडकवू. तू जास्तच सत्यवादी झाला. तुझ्यासारखे गाडीखाली कित्येक चिरडून मारले तुला पण गाडी खाली चिरडून मारू. आमच्या फार मोठ्या मोठ्या ओळखी आहे. आमच्याकडे खुप पैसा आहे तू आमचे झाटा वाकडे करू शकत नाही . जर पोलिस स्टेशन मध्ये गेला आमच्या विरोधात तक्रार नोंदवली तर तुला जिवे ठार करू आदी.
सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी ही घटना घडली त्या वेळी प्रत्यक्ष दर्शी वसंत कांगूने, किशोर गरुळें, उपसरपंच गणेश कोकने, वसंत भद्रे, अशोक गोलवड , कल्याण शिंदे सर, नितीन डुकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांच्या देखत मार हान करत असताना बहिरा राजा आणि आंधळी प्रजा झाली होती. गावातून अवैध मुरूम वाहतूक करून बक्कळ पैसा कमावला आणि सामान्य नागरिक यांना दबाव टाकत आहे . दमबाजी कारणे जिवे मारणे या नित्याच्याच बाबी झाल्या आहेत.
मला न्याय मिळावा अन्यथा मी जगावे की मारावे लेखी कळावे. मी दोषी असेल तर मला कायद्याने जरूर शिक्ष करावी .